Next
महिला प्रवाशांसाठी विशेष सहा बसेस दाखल
टाटा मोटर्सने तयार केल्या मिडी बसेस
BOI
Monday, February 11, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this story


पुणे : महाराष्ट्र सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत खास महिला प्रवाशांसाठी टाटा मोटर्स कंपनीने तयार केलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज सहा अल्ट्रा नाईन एम डिझेल मिडी बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. मार्च २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने आणखी २७ बसेस दाखल होणार आहेत. 

अल्ट्रा व्यासपीठावर तयार करण्यात आलेल्या या बसेस चालक, वाहक आणि प्रवासी अशा सर्वांच्याच सोयीच्या आहेत. ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनमुळे (एएमटी) चालकांना बस चालवताना आरामदायी अनुभव मिळतो. महिला प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन या बसमध्ये फायर डिटेक्शन अॅंड सस्पेंशन सिस्टीम (एफडीएसएस) यासारख्या सर्वोत्कृष्ट श्रेणीतील सुविधा देण्यात आल्या आहेत. यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम्स (आयटीएस) देण्यात आली आहे. जीपीएसच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक डेस्टिनेशन डिस्प्ले बोर्डही कार्यरत आहेत. यातील इनबिल्ट टेलिमॅटिक्स प्रणालीच्या साह्याने स्टेट ट्रान्सपोर्ट युनिट्सना (एसटीयू) संपर्काच्या अधिक सुविधा मिळतील. गाडीची देखभाल करणे, त्यांचा ट्रॅक ठेवणे या गोष्टी सोप्या होतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link