Next
‘महिंद्रा’ची नवीन ‘मॅराझो’
प्रेस रिलीज
Wednesday, August 01, 2018 | 02:09 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा अॅंड महिंद्रा कंपनीच्या ‘यू-३२१’ या कारच्या आगामी नव्या मॉडेलचे नामकरण ‘मॅराझो’ असे केले आहे. बास्क या स्पॅनिश भाषेच्या उपभाषेतील मॅराझो हा शब्द असून, त्याचा अर्थ शार्क असा आहे. ‘यू-३२१’ या गाडीचे डिझाइन शार्क माशासारखे भासत असल्याने हे नाव या गाडीला देण्यात आले आहे.

महिंद्रा डिझाइन स्टुडिओ आणि इटालीतील डिझाइन कंपनी पिनिनफरिना यांनी संयुक्तरित्या ‘मॅराझो’चे डिझाइन बनविले आहे. महिंद्राच्या बोल्ड स्वरूपाच्या आणि नव्या दमाच्या गाड्यांची प्रतिमा या डिझाइनमधून प्रतीत व्हावी, हा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. ‘मॅराझो’चा आकार, ठेवण ही शार्क माशासारखी असून, पुढील भागातील ग्रिल हे शार्कच्या दातांप्रमाणे आहे. गाडीच्या टेल लॅम्पची ढबदेखील शार्कच्या शेपटीसारखी आहे. यातून ही गाडी अतिशय आक्रमक असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे.

‘मॅराझो’ हे जागतिक स्तरावर विकसित करण्यात आलेले उत्पादन आहे. महिंद्रा नॉर्थ अमेरिकन टेक्निकल सेंटर (एमएनएटीसी) व चेन्नई येथील महिंद्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही) येथे मॅराझो हे वाहन घडविण्यात आले. या मॉडेलमध्ये अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि नवीन स्वरूपाची कलात्मकता आणण्यासाठी ‘एमएनएटीसी’मधील अभियंत्यांची जागतिक स्वरूपाची क्षमता, तसेच ‘एमआरव्ही’मधील तज्ज्ञ पथकाचे कौशल्य हे महत्त्वपूर्ण ठरले आहे. अतिशय आरामशीर प्रवास, चपळपणा, भरपूर जागा आणि शांत केबिन अशी वैशिष्ट्ये असलेल्या ‘मॅराझो’च्या या बांधणीचे पेटंट घेण्यात आले आहे.

‘मॅराझो’च्या नामकरण प्रसंगी महिंद्रा अॅंड महिंद्रा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका म्हणाले, ‘शार्क ही प्रेरणा असलेल्या ‘मॅराझो’मुळे महिंद्राच्या आगामी उत्पादनांची दिशा निश्चित होत आहे. पिनिनफरीना, महिंद्रा डिझाइन स्टुडिओ, ‘एमएनएटीसी’ आणि महिंद्रा रिसर्च व्हॅली या सर्वांनी परिश्रम घेतले आणि ग्राहकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन त्यांना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाहन देण्याच्या दृष्टीकोनातून ‘मॅराझो’ तयार करण्यात आली.’

‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’च्या वाहन निर्मिती विभागाचे प्रमुख राजन वधेरा म्हणाले, ‘मॅराझोची बांधणी व तिचा विकास यांची प्रक्रिया लक्षात घेता, जागतिक श्रेणीतील इतर कोणत्याही वाहनाची ‘मॅराझो’शी तुलना करता येईल. गाडीतील प्रशस्त जागा, आरामदायीपणा, शांत केबिन, उत्कृष्ट प्रतीची कूलिंग यंत्रणा, उत्कृष्ट सुरक्षा आणि दणकट बॉडी ही ‘मॅराझो’ची वैशिष्ट्ये आहेत. व्हीलबेस आणि फ्रंट ट्रॅक यांची रचना महिंद्राच्या अन्य मॉडेल्सपेक्षा मोठी आहे. त्यामुळेच ‘मॅराझो’ ही एक बेंचमार्क तयार करील आणि तिच्या श्रेणीत ती एक गेम-चेंजर बनेल, असा विश्वास वाटतो.’

गुणवत्ता, तंत्रज्ञान, चाचणी आणि वैधता मानदंड, सुरक्षितता, विनियम आणि वायूंचे उत्सर्जन या जागतिक मानकांनुसार महिंद्रा ‘मॅराझो’ ही एक बेंचमार्क बनली आहे. ‘मॅराझो’च्या अत्यंत कठोर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील नाशिक येथील कंपनीच्या कारखान्यात ‘मॅराझो’चे उत्पादन करण्यात येईल. २०१९ च्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये हे वाहन बाजारात आणण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link