Next
स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचा रविवारी बक्षीस समारंभ
स्वप्नजा वालावडकर, मोहिनी कुलकर्णी, शेखर माळवदे विजेते
BOI
Saturday, March 02, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, पारितोषिक वितरण समारंभ रविवारी, तीन मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये होणार आहे. 

‘पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ पत्रकार उदय माहूरकर, अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे आणि लोकमान्य सोसायटीचे सुशील जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम क्रमाकांच्या विजेत्याला दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून, प्रत्येक विजेत्याला आपले भाषण सादर करण्याची संधी मिळणार आहे. यातून महाविजेत्याची निवड केली जाणार असून, त्याला अंदमानला भेट देण्याची संधी मिळणार आहे,’ अशी माहिती संस्थेचे प्रवीण गोखले यांनी दिली. 

‘विविध आठ गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत स्वप्नजा वालावडकर, मोहिनी कुलकर्णी, शेखर माळवदे, जाई ठाणेकर आदि माळवदे यांच्यासह ओजस जोशी, सोहम कुलकर्णी, मधुरा घोलप, विवेक कुलकर्णी, नितीन पटवर्धन व विनय वाटवे प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत एकूण ४०० स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष होते,’ असेही गोखले यांनी नमूद केले.  

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आजच्या युवा पिढीने देशासाठी काम करावे, या उद्देशाने स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे व्हॉटसअॅपच्या माध्यमातून दृकश्राव्य स्वरूपातील वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला देशातून तसेच परदेशातूनही प्रतिसाद मिळाला. महिला स्पर्धकांचा प्रतिसाददेखील उल्लेखनीय होता. या स्पर्धेत इयत्ता नववी ते १२ वी या गटात स्वप्नजा वालावडकर, २२ ते ४५ वर्षे वयोगटात मोहिनी कुलकर्णी, तर खुल्या गटातील नाट्यवाचन स्पर्धेत शेखर माळवदे, जाई ठाणेकर, आदि माळवदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पाचवी ते आठवी गटात ओजस जोशी, सोहम कुलकर्णी यांनी विभागून प्रथम क्रमांक मिळवला आहे. महाविद्यालयीन गटात मधुरा घोलप, व्यावसायिक गटात विवेक कुलकर्णी, वरिष्ठ गटात नितीन पटवर्धन, ६० वर्षांपुढील गटात विनय वाटवे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे,’ असेही गोखले यांनी सांगितले.  

कार्यक्रमाविषयी 
स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस समारंभ 
स्थळ : अॅम्फी थिएटर, फर्ग्युसन महाविद्यालय. 
दिवस व वेळ : रविवार, तीन मार्च २०१९, संध्याकाळी ४ वाजता. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link