Next
तुम्ही यातली किती मराठी पुस्तकं वाचलीयत?
BOI
Monday, February 26, 2018 | 10:30 AM
15 0 0
Share this article:


पुस्तक दिन असो किंवा मराठी राजभाषा दिन.... आपण मराठी किती बोलतो, ऐकतो, पाहतो याबरोबरच किती वाचतो याचा विषय निघतोच! आणि मग आपसूकच गाडी येते मराठी पुस्तकांवर!! कोणी कोणी आतापर्यंत नक्की काय वाचलंय, सध्या काय वाचतोय आणि काय वाचायचं राहिलंय याविषयी औत्सुक्य असतंच. म्हणून आम्ही अशा काही पुस्तकांची यादी देत आहोत, की जी प्रत्येक मराठी माणसानं अवश्य वाचायलाच हवीत. ही यादी अर्थातच परिपूर्ण नाही; पण मराठी भाषेचं सौंदर्य आकळण्यासाठी वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली आणि विविध साहित्यप्रकार हाताळले गेलेली किमान एवढी पुस्तकं तरी नक्कीच वाचायला हवीत. 
............
ज्ञानेश्वरी : ज्ञानेश्वर 
तुकाराम गाथा : तुकाराम 
सार्थ श्रीमत् दासबोध : समर्थ रामदास (बेलसरे)
माझा प्रवास अथवा सन १८५७ सालच्या बंडाची हकिगत : विष्णुभट गोडसे
स्मृतिचित्रे : लक्ष्मीबाई टिळक 
अजगर : चिं. त्र्यं. खानोलकर 
चिमणरावाचे चऱ्हाट : चिं. वि. जोशी
श्रीविठ्ठल - एक महासमन्वय : रा. चिं. ढेरे
लज्जागौरी : रा. चिं. ढेरे
शुभ्र काही जीवघेणे : अंबरीश मिश्र
बाई : अंबरीश मिश्र, विजया मेहता 
मुसाफिर : अच्युत गोडबोले 
फकीरा : अण्णा भाऊ साठे
एमटी आयवा मारू : अनंत सामंत
माणसं : अनिल अवचट 
स्वतःविषयी : अनिल अवचट 
जन-मन : अरुण टिकेकर 
सिंहासन : अरुण साधू
कृष्णकिनारा : अरुणा ढेरे
मैत्रेयी : अरुणा ढेरे
एका अस्वस्थ दशकाची डायरी : अविनाश धर्माधिकारी 
दशपदी : आ. रा. देशपांडे 
कुसुमानिल : आ. रा. देशपांडे 
झोंबी : आनंद यादव
हा जय नावाचा इतिहास आहे : आनंद साधले
इंदिरा संत यांची समग्र कविता : इंदिरा संत
युगान्त : इरावती कर्वे
धग : उद्धव शेळके
बंध अनुबंध : कमल पाध्ये
कोल्हाट्याचं पोर : किशोर काळे 
विशाखा : कुसुमाग्रज
१०० कविता : कुसुमाग्रज
साता उत्तराची कहाणी : ग. प्र. प्रधान
दुर्दम्य : गंगाधर गाडगीळ
गाडगीळांच्या कथा : गंगाधर गाडगीळ
एका मुंगीचे महाभारत : गंगाधर गाडगीळ
गीत रामायण : ग. दि. माडगूळकर 
एका तेलियाने : गिरीश कुबेर
आकाशदर्शन अॅटलास : गो. रा. परांजपे
जेव्हा माणूस जागा होतो : गोदावरी परुळेकर 
कुणा एकाची भ्रमणगाथा : गो. नी. दांडेकर 
संपूर्ण आगरकर : गोपाळ गणेश आगरकर
वाचता वाचता खंड १ आणि २ : गोविंद तळवलकर 
सत्तांतर खंड १, २, ३ : गोविंद तळवलकर 
आहे हे असं आहे : गौरी देशपांडे
एकेक पान गळावया : गौरी देशपांडे
विंचुर्णीचे धडे : गौरी देशपांडे
चंद्रमाधवीचे प्रदेश : ग्रेस
सांध्यपर्वातील वैष्णवी : ग्रेस
यक्षांची देणगी : जयंत नारळीकर 
निवडक ठणठणपाळ : जयवंत दळवी
सारे प्रवासी घडीचे : जयवंत दळवी
काजळमाया : जी. ए. कुलकर्णी 
सांजशकुन : जी. ए. कुलकर्णी 
हिरवे रावे : जी. ए. कुलकर्णी 
पिंगळावेळ : जी. ए. कुलकर्णी 
झाले मृगजळ आता जलमय : दत्ता भट
बलुतं : दया पवार 
आनंद ओवरी : दि. बा. मोकाशी 
ऋतुचक्र : दुर्गा भागवत
पैस : दुर्गा भागवत
व्यासपर्व : दुर्गा भागवत
धार आणि काठ : नरहर कुरुंदकर 
आमचा बाप अन् आम्ही : नरेंद्र जाधव
गोट्या : ना. धों. ताम्हनकर
राऊ : ना. सं. इनामदार
गुजगोष्टी : ना. सी. फडके
वीरधवल : नाथमाधव
चंद्राची सावली : नारायण धारप 
माझे विद्यापीठ : नारायण सुर्वे 
वाचत सुटलो त्याची गोष्ट : निरंजन घाटे 
गर्भश्रीमंतीचे झाड : पद्मजा फाटक
हसरी किडनी : पद्मजा फाटक
छांदसी : पु. शि. रेगे 
सावित्री : पु. शि. रेगे 
अपूर्वाई : पु. ल. देशपांडे 
असा मी असामी : पु. ल. देशपांडे 
बटाट्याची चाळ : पु. ल. देशपांडे 
व्यक्ती आणि वल्ली : पु. ल. देशपांडे 
हसवणूक : पु. ल. देशपांडे 
मित्रहो : पु. ल. देशपांडे 
श्रोतेहो : पु. ल. देशपांडे 
सृजनहो : पु. ल. देशपांडे 
पूर्वरंग : पु. ल. देशपांडे 
जावे त्यांच्या देशा : पु. ल. देशपांडे 
तुझे आहे तुजपाशी : पु. ल. देशपांडे 
झुंबर : प्र. ना. संत 
पंखा : प्र. ना. संत 
वनवास : प्र. ना. संत 
शारदा संगीत : प्र. ना. संत 
प्रकाशवाटा : प्रकाश आमटे 
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी : प्रतिभा रानडे
रारंगढांग : प्रभाकर पेंढारकर 
चारचौघी : प्रशांत दळवी 
पंचतारंकित : प्रिया तेंडुलकर
महिमा मुंबईचा : फिरोज रानडे
मुंबईतील प्रार्थनास्थळे : फिरोज रानडे
बोरकरांची समग्र कविता (खंड १ आणि २) : बा. भ. बोरकर
मर्ढेकरांची कविता : बा. सी. मर्ढेकर 
एक गाव एक पाणवठा : बाबा आढाव
राजा शिवछत्रपती : बाबासाहेब पुरंदरे
निवडक बाबुराव अर्नाळकर : बाबुराव अर्नाळकर
जेव्हा मी जात चोरली : बाबुराव बागुल 
बालकवींची समग्र कविता : बालकवी
समग्र बालकवी : बालकवी 
तांबे यांची समग्र कविता : भा. रा. तांबे
फास्टर फेणे - वीस भाग : भा. रा. भागवत 
बदलता भारत : भानू काळे 
कोसला : भालचंद्र नेमाडे 
जीएंची निवडक पत्रे (भाग १ आणि २) : म. द. हातकणंगलेकर 
निवडक मंगला गोडबोले : मंगला गोडबोले
भटके पक्षी : मंगेश पाडगावकर
जिप्सी : मंगेश पाडगावकर
तिसरी घंटा : मधुकर तोरडमल 
एक सम्राट एक सम्राज्ञी : मधुकर तोरडमल 
नक्षत्रलोक : महादेवशास्त्री जोशी
निवडक माणूस : माणूस प्रतिष्ठान 
पत्र : माधव आचवल
गीतयात्री : माधव मोहोळकर 
नाच गं घुमा : माधवी देसाई
वाचू आनंदे - चार भाग : माधुरी पुरंदरे 
चकवा चांदण : मारुती चितमपल्ली
शाळा : मिलिंद बोकील
माझं लंडन : मीना प्रभू
मराठी शुद्धलेखन प्रदीप : मो. रा. वाळंबे
आठवणीतल्या कविता - चार भाग : मौज प्रकाशन 
बापलेकी : मौज प्रकाशन 
कुणास्तव कुणीतरी : यशोदा पाडगावकर
श्रीमान योगी : रणजित देसाई
स्वामी : रणजित देसाई
खेकडा : रत्नाकर मतकरी
गहिरे पाणी : रत्नाकर मतकरी
रामनगरी : राम नगरकर 
सौंदर्यमीमांसा : रा. भा. पाटणकर 
उचल्या : लक्ष्मण गायकवाड 
पार्टनर : व. पु. काळे
वपुर्झा : व. पु. काळे
आर्य : वसंत पटवर्धन 
इस्त्रायल युद्ध युद्ध आणि युद्धच : वि. ग. कानिटकर 
पांढरे केस हिरवी मने : वि. द. घाटे 
माझी जन्मठेप : वि. दा. सावरकर
नटसम्राट : वि. वा. शिरवाडकर
अमृतवेल : वि. स. खांडेकर
ययाती : वि. स. खांडेकर
स्वेदगंगा : विंदा करंदीकर 
मृद्गंध : विंदा करंदीकर 
झिम्मा : विजया मेहता
बहुपेडी विंदा : विजया राजाध्यक्ष
आवडलेली माणसं : विद्याधर पुंडलिक 
रणांगण : विश्राम बेडेकर
पानिपत : विश्वास पाटील
झाडाझडती : विश्वास पाटील
एक होता कार्व्हर : वीणा गवाणकर
बनगरवाडी : व्यंकटेश माडगूळकर
सत्तांतर : व्यंकटेश माडगूळकर
दिवाकरांच्या नाट्यछटा : शंकर गर्गे 
निवडक शकुंतला परांजपे : शकुंतला परांजपे
अनुबंध : शांताबाई शेळके 
जाणता अजाणता : शांताबाई शेळके 
गाये चला जा : शिरीष कणेकर
यादों की बारात : शिरीष कणेकर
छावा : शिवाजी सावंत
मृत्युंजय : शिवाजी सावंत
जागर : शिवाजीराव भोसले
दीपस्तंभ : शिवाजीराव भोसले
सर्कस सर्कस : श्यामला शिरोळकर 
रघुनाथाची बखर : श्री. ज. जोशी 
आनंदी गोपाळ : श्री. ज. जोशी 
पुणेरी : श्री. ज. जोशी 
गारंबीचा बापू : श्री. ना. पेंडसे
लव्हाळी : श्री. ना. पेंडसे
रथचक्र : श्री. ना. पेंडसे
डोह : श्रीनिवास विनायक कुलकर्णी
सुदाम्याचे पोहे : श्रीपाद कोल्हटकर 
लमाण : श्रीराम लागू
सय : सई परांजपे 
बारोमास : सदानंद देशमुख
श्यामची आई : साने गुरुजी
पक्ष्यांचे ठसे : सुधीर मोघे
आहे मनोहर तरी : सुनीता देशपांडे
अमलताश : सुप्रिया दीक्षित 
दुनियादारी : सुहास शिरवळकर
बालकांड : ह. मो. मराठे 

(http://www.bookganga.com या पोर्टलवर हजारो मराठी पुस्तके अन् ई-बुक्स उपलब्ध आहेत. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
प्रकाश केशव वीरकर About 120 Days ago
मी या एकूण 183 पुस्तकांपैकी 87 पुस्तके वाचली असून यातील बहुतेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. परंतु यामध्ये अजून अनेक पुस्तकांचा समावेश हवा होता. खूप वाचनीय तथा आवर्जून संग्रही ठेवावीत अशी अनेक पुस्तके आहेत.
0
0

Select Language
Share Link
 
Search