Next
वसंत ऋतूचे सुरेल स्वागत
‘स्वर वसंत’ कार्यक्रमात सुरेल वादन आणि गायन सादर
BOI
Friday, March 29, 2019 | 11:52 AM
15 0 0
Share this article:

‘स्वर वसंत’ कार्यक्रमात उर्वशी शाह यांनी शास्त्रीय गायन सादर केले.

पुणे : ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘स्वर वसंत’ या शास्त्रीय संगीत कार्यक्रमाद्वारे व्हायोलिन वादन, सरोदवादन आणि शास्त्रीय गायनाच्या माध्यमातून वसंत ऋतूचे मनोरम स्वागत करण्यात आले.

पश्चिम बंगालचे कलाकार पंडित पार्थसारथी यांनी सरोदवादन, तर अंजली सिंगडे-राव यांनी व्हायोलिन वादन केले. पंडित पार्थसारथी यांनी शृंगार आणि विरहाचा आविष्कार असणारा, वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करणारा राग शुध्द बसंत सादर केला. त्यांच्या वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. पंडित पार्थसारथी आणि तबलावादक रामदास पळसुले यांच्या रंगलेल्या जुगलबंदीने या मैफलीने कळसाध्याय गाठला.

‘स्वर वसंत’ कार्यक्रमात पंडित पार्थ सारथी आणि तबलावादक रामदास पळसुले यांची जुगलबंदी रंगली.

त्यानंतर उर्वशी शाह यांनी शास्त्रीय गायन सादर केले. त्यांनी ‘पुरीया धनश्री’ रागातील विलंबित ख्याल सादर केला. ‘तुम ही पालनहार’ ही रचनाही सादर केली. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. पंडित रामदास पळसुले यांनी तबला, तर लीलाधर चक्रदेव  यांनी हार्मोनियमची साथ केली.

‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक सचदेव साहा दास यांनी कलाकारांचे स्वागत केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Prof. Nandkumar Kakirde About 177 Days ago
Very nice coverage of bhavan and Infosys Foundation - cultural Outreach programmes..
0
0

Select Language
Share Link
 
Search