Next
वारजे गुरुपूजन सोहळा उत्साहात
BOI
Sunday, July 29 | 03:30 PM
15 0 0
Share this story



पुणे : येथील श्री श्री श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराज व श्री श्री श्री भाऊ महाराज सांस्कृतिक महासमिती यांच्यातर्फे गुरुपूजन सोहळा नुकताच वारजे येथील जिजाई गार्डन कार्यालय या ठिकाणी उत्साहात झाला.

या वेळी आयोजित करण्यात आलेल्या भक्तीगीत गायन कार्यक्रमात प्रसिद्ध गायक राजेश दातार आणि श्रुती देवस्थळी सुनीता चौधरी यांनी गाणी, तर फिरोज यांनी बहारदार नृत्य सादर केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दिवसभर चालेलेल्या या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या वेळी भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.

गायक दातार यांनी ‘गुरु परमात्मा परशु’, ‘नंदनंदन मुरलीवाला’, ‘राधे तुला’, ‘सद्गुरू फक्त जगतमे’, ‘माझे माहेर पांढरी’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘गुरुविण नाही’, ‘पैल तोगे काऊ’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘रुणु झुणु रे भ्रमरा’ अशा एकाहून एक रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. या वेळी दातार यांना पद्माकर गुजर, प्रतिक गुजर, चंद्रकांत निगडे या सर्व कलाकारांनी साथसंगत दिली. दयानंद घोटकर यांनी कार्यक्रमाचे निरुपण केले.

महोत्सवाला अनेक मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवाची परंपरा अशीच आम्ही अखंडीत सुरू ठेवू अशी भावना या प्रसंगी श्री. श्री. श्री. सद्गुरू पारवडेश्वर महाराज व श्री श्री श्री भाऊ महाराज सांस्कृतिक महासमितीतर्फे यांनी व्यक्त करण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link