Next
अनिल शिरोळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Wednesday, October 03, 2018 | 05:01 PM
15 0 0
Share this article:

येरवडा कारागृहातील ‘महात्मा ऑन सेल्युलॉइड’ या चित्रपट प्रदर्शनीचे उद्घाटन करताना खासदार अनिल शिरोळे.पुणे : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधत येथील येरवडा कारागृहात ‘महात्मा ऑन सेल्युलॉइड’ या चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले.

येरवडा कारागृहातील कैद्यांसाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या उपसंचालिका कीर्ती तिवारी आणि कारागृह अधिक्षक यु. टी. पवार हे या वेळी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना खासदार शिरोळे म्हणाले, ‘महात्मा गांधीजींचा प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव पडला आहे. चित्रपटांवर तो पडला नसेल, तर नवलच. त्याचा वेध घेणारी ही पोस्टर प्रदर्शनी कारागृहातील कैद्यांसाठी एक प्रेरणाच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात चित्रपटांच्या माध्यमातून कशाप्रकारे जनजागृती झाले, हे या प्रदर्शनीच्या माध्यमातून समोर येत आहे. मी स्वत: १९७५च्या सुमारास आणीबाणीच्या वेळेस एक वर्ष येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होतो, त्या वेळचे वातावरण अभूतपूर्व असेच होते.’

‘सध्या देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५०वे जयंती वर्ष साजरे केले जात आहे. याचेच औचित्य साधत १५ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरदरम्यान देशभरात स्वच्छतेचा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानात देशातील नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन शिरोळे यांनी या वेळी केले.

या चित्रपटांच्या पोस्टर्समध्ये ‘भक्तविदुर’ (१९२१) या मूकपटासह वेगवेगळ्या भाषांमधील सुमारे २५ अन्य चित्रपटांची पोस्टर्स आहेत. याबरोबरच ‘अछूतकन्या’ (हिंदी, १९३६), ‘बालयोगिनी’ (तामिळी, १९३६), ‘कुंकू’ (मराठी, १९३६), ‘सेवासदन’ (तामिळी, १९३८), ‘मालापिल्ला’ (तेलगू, १९३८), ‘त्यागभूमी’ (तामिळी, १९३९), ‘आदमी’ (हिंदी, १९३९), ‘एकता’ (सिंधी, १९४२), ‘उदयेरपाथेय’ (बंगाली, १९४४), ‘मीराबाई’ (गुजराती, १९४७), ‘पियोलीफुकन’ (आसामी, १९५५), ‘गांधीसे महात्मा तक’ (हिंदी, १९९६), ‘लगे रहो मुन्नाभाई’ (हिंदी, २००६) आदी चित्रपटांच्या पोस्टर्सचा देखील समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search