Next
‘डीकेटीईसारख्या शैक्षणिक संस्थेची समाजाला गरज’
प्रेस रिलीज
Thursday, May 03 | 12:16 PM
15 0 0
Share this story

‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकल विभागात आयोजित राष्ट्रीय परिसंवादात मार्गदर्शन करताना किर्लोस्कर टोयोटाचे सिनिअर व्हाईस प्रेसिडंट राजू केटकाळे. शेजारी कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिन शिरगांवकर,

इचलकरंजी : ‘शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या बदलांचा अभ्यासक्रमात समावेश करणे ही काळाची गरज आहे. देशाचा भावी इंजिनीअर हा इंडस्ट्रीमध्ये सातत्याने होत असलेल्या बदलाचे आव्हान पेलणारा हवा असेल, तर त्या पद्धतीचे उत्तम शिक्षण देणाऱ्या व इंडस्ट्रीजशी उत्तम संबंध असलेल्या ‘डीकेटीई’सारख्या शैक्षणिक संस्थेची समाजास गरज आहे,’ असे प्रतिपादन किर्लोस्कर टोयोटाचे सिनिअर व्हाईस प्रेसिडंट राजू केटकाळे यांनी केले.

येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटच्या मेकॅनिकल विभागाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे होते. ‘डीकेटीई’च्या मेकॅनिकल विभागात ‘एक्सलन्स इन डिझाइन मॅन्युफॅक्चरिंग अ‍ॅंड अ‍ॅटोमेशन २०१८’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात राष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ सहभागी झाले.

घोरपडे नाट्यगृहात आयोजित या परिसंवादाचे उद्घाटन कार्यक्रमात डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांनी ‘डीकेटीई’ व मेकॅनिकल विभागाची माहिती देऊन संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ‘ही परिषद विद्यार्थ्याना त्यांच्या शैक्षणिक दर्जा व कौशल्य विकास उंचावण्यासाठी फार महत्त्वाची ठरेल, तसेच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे रोजगार क्षमता वाढीसाठी हे चर्चासत्र त्यांना उपयुक्त ठरेल’, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. संस्थेचे अध्यक्ष आवाडे यांनी १९८२ मधील आठवणींना उजाळा देत संस्थेच्या जडणघडणीची माहिती दिली. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी ‘डीकेटीई’ ही सन २०१५ व सन २०१७ मध्ये ‘एआयसीटीई सीआयआय अ‍ॅवार्ड’ हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असल्याचे नमूद करीत रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या परिषदेचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आलेल्या तज्ञांनी सादरीकरण केले.  

केटकाळे म्हणाले, ‘आज शिक्षणामध्ये लवचिकता असण्याची गरज आहे. केवळ चॉक आणि टॉक ही शिक्षण पद्धत चालणार नाही. शिक्षणामध्ये पारदर्शीपणा असण्याची अत्यंत गरज निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांना हवे ते देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता जगासमोर दाखविण्याची गरज असून, यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची आवश्यकता आहे. यातून जागतिक पातळीवर नेमके काय चालू आहे याचीही माहिती विद्यार्थ्यांना होत राहील. विद्यार्थ्यांनी सतत स्पर्धेत सहभागी होत आपले गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे. डिझाइन, उत्पादन आणि अ‍ॅटोमेशन आधारीत तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी अवगत करणे गरजेचे आहे.’
 
एस. बी. रिशेलर्सचे सचिन शिरगांवकर यांनी ‘उदयोगविश्‍वातील चौथी क्रांती इंडस्ट्री ४.०’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मेकॅनिकल विभागातील राष्ट्रीय परिषद स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मेकॅनिकलच्या पहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ‘नॅट फौंड्री’चे एमडी सुरेंद्र जैन, ‘सीआयआय’ वेर्स्टर्न रिजनचे व्हाईस चेअरमन प्रताप पुराणिक, ट्रस्टी डॉ. अशोक सौंदत्तीकर, बी. बी. कागवाडे यांसह सर्व विश्वस्त आणि इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते. प्रा. एस. ए. सौंदत्तीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पी. एन. गोरे व प्रा. यु. एस. खाडे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link