Next
ठाण्याच्या प्रशांत सोलंकीची उत्कृष्ट गोलंदाजी
‘टी २० मुंबई क्रिकेट लीग’मध्ये पदार्पणातच टिपले चार गडी
BOI
Friday, May 24, 2019 | 03:40 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या सुरू असलेल्या ‘टी २० मुंबई क्रिकेट लीग’ स्पर्धेत ‘इगल ठाणे स्ट्रायकर’ संघाकडून खेळत असलेला प्रशांत सोलंकी याने दमदार गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लेग स्पिनर प्रशांतने चार षटकांत प्रतिस्पर्धी ‘आर्क्स अंधेरी’ संघातील चार महत्त्वाचे फलंदाज बाद केले. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

१४ ते २६ मे दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही ‘टी २० मुंबई क्रिकेट लीग’ स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेसाठी ठाण्याचा १९वर्षीय लेग स्पिनर प्रशांत सोलंकी हा ‘इगल ठाणे स्ट्रायकर’ संघाकडून खेळत आहे. दरम्यान या स्पर्धेच्या आठव्या दिवशी म्हणजेच २१ मे रोजी ‘इगल ठाणे स्ट्रायकर’ आणि ‘आर्क्स अंधेरी’ या दोन संघात सामना रंगला होता. याच सामन्यातून प्रशांत सोलंकीने स्पर्धेत पदार्पण केले. 

‘आर्क्स अंधेरी’ संघाने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. पहिला सलामीवीर फलंदाज लवकर बाद झाला, तरीही सलामीवीर असलेला कर्णधार केविन अल्मेडा आणि इक्बाल अब्दुल्ला यांनी शतकी भागिदारी केली. या वेळी प्रशांत सोलंकीने ही जोडी आपल्या फिरकीच्या जादूवर माघारी धाडली. केविनला झेलबाद तर इक्बाल अब्दुल्लाला यष्टीरक्षकाकरवी स्टंपिंग केले. 

त्यानंतर शुभम रांजणे याला झेलबाद केले आणि अझर अन्सारीला यष्टीरक्षकाकरवी स्टंपिंग केले. चार षटकांत ३१ धावांच्या मोबदल्यात प्रशांतने चार बळी घेतले. या सामन्यात ‘इगल ठाणे स्ट्रायकर’ संघाचा १२ धावांनी पराभव झाला असला, तरी चारही रणजीपटू असलेल्या फलंदाजांना बाद केल्याने प्रशांत सोलंकीचा आत्मविश्वास वाढला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search