Next
‘सोशल अल्फा एनर्जी चॅलेंज’ प्रवेशासाठी आवाहन
प्रेस रिलीज
Wednesday, February 14 | 02:25 PM
15 0 0
Share this story

मुंबई : टाटा ट्रस्ट्स फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड सोशल आंत्रप्रेन्‍युअरशीप (एफआयएसई) या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या शोधमोहिमेंतर्गत, ऊर्जा क्षेत्राला चालना देणार्‍या संशोधनाचा शोध घेण्यात येणार आहे. ‘सोशल अल्फा एनर्जी चॅलेंज’ या उपक्रमाची संस्थेतर्फे नुकतीच घोषणा करण्यात आली असून, तंत्रज्ञानाधारित सोल्यूशन्सना सहाय्य करणार्‍या या उपक्रमात प्रयोगशाळेपासून बाजारपेठेपर्यंतचा संशोधनाचा अभ्यास मांडण्यात येणार आहे.

क्लिनटेक, शाश्वतता आणि ऊर्जासक्षमतेवर भर देत, भारतातील ऊर्जाविषयक आव्हाने पेलून स्मार्ट स्‍वच्छ आणि किफायतशीर नेटवर्कच्या आधारे त्यावर उपाययोजना आखण्याचा व त्यांची अंमलबजावणी करून घेण्याचा या स्पर्धेचा मूळ हेतू आहे. या ध्येयवादी शोधमोहिमेत ऊर्जा जीवनसाखळीच्या विविध पातळ्यांवर संशोधन सुरू असणार्‍यांचे प्रवेश मिळवणे हे मोठे आव्हान आहे. यात जनरेशन, ट्रान्समिशन आणि वितरण, साठवणूक व घरगुती, कृषी, उद्योग, इन्फ्रास्ट्रक्चर, बांधकाम, युटिलिटी आणि दळणवळण या क्षेत्रांतील ऊर्जेचा वापर अशा विविध क्षेत्रांचा समावेश होतो.

संशोधनाचे स्‍वरूप, व्यापारी उपयुक्तता, पर्यावरणीय शाश्वती, सामाजिक परिणाम आणि क्षमता या महत्त्वपूर्ण निकषांवर विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. टाटा स्मार्ट एनर्जी इन्‍क्‍युबेशन सेंटरच्या (टीएसईआयसी) पहिल्या व्यवस्थापकीय तुकडीत या ऊर्जा चॅलेंजमधील विजेत्यांचा सहभाग असणार आहे. ‘टीएसईआयसी’ या टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेड आणि टाटा ट्रस्ट्सच्या भागीदारीतून उभ्या राहणार्‍या उपक्रमातून स्टार्ट अपला चालना दिली जाणार आहे.

जास्तीत जास्त १० विजेत्यांना संपूर्ण इन्‍क्‍युबेशन सहाय्य देण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील टाटा स्मार्ट एनर्जी इन्‍क्‍युबेशन सेंटरमध्ये सहा ते अठरा महिन्यांचा अनुभव, प्रायोगिक व फील्ड टेस्टिंग आधारावर टेस्ट बेड्सना ऍक्सेस, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि जागतिक दर्जाच्या इनास्ट्रक्चरचा लाभ, धोरण व बाजारपेठ (गो टू मार्केट- जीटीएम) सहाय्य, तज्ज्ञांकडून प्रशिक्षण, वैविध्‍यपूर्ण आणि व्यापक गुंतवणूक क्षेत्रात पदार्पणास सहाय्य या बाबींचा यात समावेश असेल.

सोशल अल्फाचे सीईओ आणि टाटा ट्रस्ट्सच्या संशोधन विभागाचे प्रमुख मनोज कुमार म्हणाले, ‘आमच्या सोशल अल्फा स्थापत्याचे महत्त्वाचे अंग म्हणून आम्ही दोन वर्षांपूर्वी एफआयएसईची स्थापना केली. यातून संशोधन व व्यावसायिकतेला चालना देण्याचा आमचा हेतू होता. शाश्वतता आणि पर्यावरणीय बदलांप्रती असलेल्या टाटा ट्रस्ट्सच्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे किफायतशीर ऊर्जा संपादन करण्यामध्ये येणार्‍या आव्हानांसाठी क्लिनटेक सोल्यूशन्स तयार करण्याच्या आमच्या व्यापाराला चालना मिळाली आहे. परिणामी, मूळ पातळीपासूनच आपल्या जीवनशैली आणि शाश्वतता उपक्रमांत पूर्ण क्रांती घडवण्यात आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘टीएसईआयसी’ हे आमचे स्‍वतंत्र इन्‍क्‍युबेशन सेंटर असून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्‍त इनास्ट्रक्चर आणि डोमेन तज्ज्ञतेसह ऊर्जाविषयक आव्हानांना तोंड देणे हा यामागचा मूळ हेतू आहे.’

टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ परवीर सिन्हा म्हणाले, ‘संपूर्ण ऊर्जात्मक मूल्याधारित साखळीमध्ये संशोधन, डोमेन आणि व्यापार तज्ज्ञता आणणे आणि त्याद्वारे नवीन संधी व सामाजिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी शाश्वत सोल्यूशन्स निर्माण करणे हा टाटा स्मार्ट एनर्जी इन्‍क्‍युबेशन केंद्रांचा मूळ उद्देश आहे. ‘टी-एसईआयसी’च्या माध्यमातून किफायतशीर सोल्यूशन्स पुरवणार्‍या स्टार्ट-अप उद्योजकांना योग्य इकोसिस्टीम पूरवून सहाय्य देण्याचा आमचा विचार आहे. भारतातील किफायतशीर तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या किकासासाठी ‘टीएसईआयसी’ उपयुक्त ठरेल, असा विश्वास मला वाटतो.’

अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारिख : सात एप्रिल २०१८
सहभागी नोंदणीसाठी : http://socialalphachallenge.org/energy
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link