Next
वाघोलीकर, रचना शहा यांना वॉव अॅवॉर्ड
प्रेस रिलीज
Monday, December 11, 2017 | 02:15 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर ‘स्वरलता’ हे कॉफी टेबल बुक लिहिणारे पुण्यातील युवा लेखक रिदम वाघोलीकर आणि अतिथी संपादक रचना खडीकर-शहा यांना ‘वॉव’ पारितोषिक मिळाले आहे.

ब्लिस इक्विटी पब्लिकेशन्सतर्फे मुंबईत आयोजित समारंभात अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले. हा कार्यक्रम ९ डिसेंबर रोजी झाला.

ग्रामोफोन डिस्कच्या अनोख्या आकारात प्रसिध्द झालेल्या ‘स्वरलता’ या कॉफी टेबल बुकमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींबद्दल लिहिले आहे. दिलीपकुमार, हरिप्रसाद चौरसिया, पंडित जसराज, बिरजू महाराज, बाबासाहेब पुरंदरे, माधुरी दीक्षित, नितीन गडकरी, राज ठाकरे, मीना खडीकर, जब्बार पटेल, सुदेश भोसले, रेखा अशा ३८ दिग्गजांनी लेखन योगदान दिले आहे. लता दीदींच्या वाढदिवसाची भेट असलेल्या या कॉफी टेबल बुकचे  प्रकाशन त्यांच्याच हस्ते झाले होते. या अनोख्या प्रकाशन प्रकल्पाची दखल घेऊन ‘वॉव’ पारितोषिक देण्यात आले आहे .

रचना शहा या लतादीदींच्या भाची असून व्यवसायाने मोटीव्हेशनल स्पिकर आहेत.

रिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर-शहा यांनी गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर लिखाणाचा संकल्प केला असून फेब्रुवारी २०१८मध्ये ते प्रकाशित होईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search