Next
विद्यार्थी सहायक समितीचे प्रवेश सुरू
गरजू विद्यार्थ्यांसाठी पुण्यात वसतिगृह प्रवेश
BOI
Monday, June 10, 2019 | 05:26 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पुण्यात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना अल्पदरात निवास आणि भोजनासाठी येथील विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळू शकतो. या प्रवेश प्रक्रियेला एक जूनपासून सुरुवात झाली आहे.

गेली त्रेसष्ठ वर्षे ग्रामीण विद्यार्थ्यांना पुण्यात अल्प दरात निवास, भोजन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी ही संस्था काम करीत आहे. संस्थेची पाच सुसज्ज वसतिगृहे असून, सुमारे ४५० विद्यार्थी आणि ३२० विद्यार्थिनी येथे राहतात. उच्च शिक्षणातील विविध विद्याशाखांसाठी पुण्यात प्रवेश मिळाल्यावर समितीमध्ये प्रवेश मिळू शकेल. 

प्रवेश अर्जासोबतची कागदपत्रे तपासून मुलाखत घेतली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहाटे योगासने, कमवा व शिका योजनेत सहभाग नोंदवणे, व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदवणे अनिवार्य असते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर पडल्याचे सर्व माजी विद्यार्थ्यांचे निरीक्षण आहे. या संस्थेचे कामकाज समाजातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर सुरू असल्याने येथील नियमांची काटेकोर अमंलबजावणी होते.

गरजू विद्यार्थी–विद्यार्थीनींनी संस्थेच्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. समितीचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक एक जूनपासून www.samiti.org या संस्थेच्या वेबसाईटवर, तसेच कार्यालयात (सकाळी ११ ते सायं. ४ वा.) मिळतील.

संस्थेचा पत्ता पुढीलप्रमाणे : (मुलींचे वसतिगृह)- डॉ. अ. श. आपटे वसतिगृह, विद्यार्थी सहायक समिती, ११८२/१/४, शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रोड, पोलिस ग्राऊंड जवळ,  पुणे – ४११००५ 
फोन: (०२०) २५५३३६३१  

मुलांचे वसतिगृह - लजपतराय विद्यार्थी भवन, १०३अ, शिवाजी हौ.सो.मागे, सेनापती बापट रस्ता, पुणे ४११०१६.
फोन: (०२०) २५६३९३३० 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search