Next
नीलेश किणींगेची हॉफ विद्यापीठात ‘एमएस’साठी निवड
प्रेस रिलीज
Monday, October 08, 2018 | 11:40 AM
15 0 0
Share this story

इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमधून बीई मेकॅनिकल पदवी घेतलेल्या नीलेश किणींगे याची जर्मनीतील हॉफ युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस या विद्यापीठामध्ये ‘ऑपरेन्शल एक्सलन्स’ या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्याने आयइएलटीएस परीक्षेत यश प्राप्त केले असून, ए१ व ए२ लेव्हलचे जर्मन लँग्वेज कोर्स पूर्ण केले आहे.

हॉफ युनिव्हर्सिटीने इच्छुक विद्यार्थ्यांची ऑनलाइन चाचणीद्वारे बौद्धिक पातळी व संशोधन वृत्ती तपासली व जर्मनी येथे एमएससाठी निवड केली. याशिवाय शैक्षणिक गुणवत्ता, तसेच आर्थिक परिस्थिती या सर्वांची पडताळणी करून नीलेशची या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.  त्याने विविध राष्ट्रीय सेमिनार्समध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.  

नीलेश किणींगे‘डीकेटीई’चा हॉफ युनिव्हर्सिटीशी सामंजस्य करार झाला आहे. सध्या या कराराअंतर्गत टेक्स्टाइलमधील बरेच विद्यार्थी एक सेमिस्टरसाठी शिक्षण घेत आहेत. याअंतर्गत डीकेटीई टेक्स्टाइलचे विद्यार्थी दरवर्षी हॉफ युनिव्हर्सिटीत इंटर्नशीपसाठी जात आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण निवडीसाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हॉफ युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. स्क्रॉट उल्फगँग यांनी डीकेटीईस यापूर्वी वेळोवेळी भेटी दिल्या आहेत.
 
‘डीकेटीईमध्ये शिक्षण घेत असताना सुरुवातीपासूनच मला करिअर गाइडन्स सेलअंतर्गत उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमाची मदत झाली; तसेच डीकेटीईतील मेकॅनिकल विभागामधील रिसर्च सेंटरचा फायदा परदेशात उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेण्यासाठी झाला. डीकेटीईतील प्राध्यापकांचे वेळोवळी मार्गदर्शन व सर्व कुटुंबीयांचे सहकार्य यामुळेच मी हे यशाचे शिखर गाठू शकलो,’ अशी भावना नीलेशने व्यक्त केली.

डीकेटीईचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे.डायरेक्टर प्रशासकीय प्रा. डॉ. यू. जे. पाटील, विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन नीलेशला लाभले. या यशाबददल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, तसेच सर्व ट्रस्टींनी नीलेशला शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link