Next
लग्नाचे वऱ्हाड थेट हेलिकॉप्टरमधून..
BOI
Saturday, September 29 | 05:58 PM
15 0 0
Share this story

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात सध्या हेलिकॉप्टरची चांगलीच चर्चा सुरू आहे. ते म्हणजे एका तरुणाने घरच्यांची हेलिकॉप्टरमध्ये फिरण्याची इच्छा चक्क स्वत:च्या लग्नात पूर्ण केली आहे. त्यासाठी त्याने लग्नाचे वऱ्हाड थेट हेलिकॉप्टरमधून लग्न मंडपात दाखल केले.

‘पुणे तिथे काय उणे’ याची प्रचिती एका लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहण्यात आली. लग्नाचे वऱ्हाड थेट हेलिकॉप्टरमधून लग्नमंडपात पोहोचले. शहरातील चाकणच्या म्हाळुंगे परिसरात राहणारे गणेश शिवले हे शेती, मजूर तसेच ठेकेदार यांना बांधकाम साहित्य पुरवठादार म्हणून काम करतात. गेल्या अनेक दिवसांपासून घरच्यांना हेलिकॉप्टरमधून हवाई सफर करण्याची इच्छा होती.

दरम्यान, भोसरी येथील अच्युता गुंडरे यांच्याशी गणेश शिवले यांचा विवाह ठरला. या लग्नाच्या निमित्ताने घरच्यांची हवाई सफर करण्याची इच्छा पूर्ण करण्याचे गणेश यांनी ठरवले. यानिमित्ताने लग्न आणि घरच्यांची इच्छा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी पार पडणार होत्या. यासाठी गणेश यांनी लग्नाचे वऱ्हाडच थेट हेलिकॉप्टरमधून न्यायचे ठरवले. विवाहाच्या दिवशी गणेश आणि त्याचे कुटुंबीय थेट हेलिकॉप्टरमधून लग्नमंडपात दाखल झाले. हा शाही विवाह भोसरी येथे पार पडला. भोसरीवासियांना एक अनोखा विवाह अनुभवायला मिळाला.  

हेलिकॉप्टर उड्डाणासाठी त्यांनी पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी मागितली होती. लग्नाचे वऱ्हाड हेलिकॉप्टरमधून नेण्यासाठी त्यांना तब्बल दोन लाख २५ हजार रुपयांचा खर्च आला. मात्र, घरच्यांची इच्छा अतिशय अनोख्या पद्धतीने पूर्ण केल्याने गणेश यांनी आनंद व्यक्त केला.

( लग्नचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link