Next
वैष्णवी आडकर, इरा शहा गुवाहाटी सुपर सिरीजच्या विजेत्या
प्रेस रिलीज
Wednesday, July 25 | 03:43 PM
15 0 0
Share this story

वैष्णवी आडकर
पुणे : येथील वैष्णवी आडकर आणि इरा शहा यांनी गुवाहाटी येथे नुकत्याच पार पडलेल्या सुपर सिरीज टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले असून, अनुक्रमे १४ आणि १२ वर्षांखालील गटात त्यांनी हे यश मिळविले आहे. ऑल इंडिया टेनिस ओसिएशन आणि आसाम टेनिस असोसिएशन यांच्या वतीने गुवाहाटी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

इरा शहा
या वेळी वैष्णवीने उपांत्य फेरीत हरियाणाच्या श्रुती अहलावत हिला ६-३, ६-० ने नमविले, तर अंतिम फेरीत तिने महाराष्ट्राच्या परी सिंग हिचा ६-४, ६-१ असा पराभव केला. पाचगणी येथे झालेल्या नॅशनल सिरीजनंतर वैष्णवीने मिळविलेले हे मोठे यश आहे. १२ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्याच इरा शहाने चमकदार कामगिरी करीत मोठे यश मिळवीत आपले नाव सुपर सिरीजवर कोरले.  तिने उपांत्य फेरीत कर्नाटकच्या सोहा सिंगचा ७-५, ७-५ असा पराभव केला, तर अंतिम फेरीत तेलंगणाच्या रिधी पोका चौधरी हिचा ६-२, ७-५ ने पराभव करून विजय मिळविला. 

सध्या वैष्णवी एरंडवणे येथील अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत असून, बाउन्स टेनिस अकादमीचे केदार शाह यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. इरा शाह सेंट मेरीज स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत असून, केतन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.     
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link