Next
शौर्य गुढीद्वारे पुलवामातील शहिदांना अभिवादन
अमित बागुल मित्रपरिवारातर्फे शहिदांच्या निवासस्थानी उपक्रम
प्रेस रिलीज
Monday, April 08, 2019 | 11:40 AM
15 0 0
Share this article:



पुणे : शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा येथील शहीद झालेले सीआरपीएफचे जवान नितीन राठोड व शहीद संजय राजपूत यांच्या निवासस्थानी गुढी पाडव्यानिमित्त शौर्य गुढी उभारून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्रपरिवाराने या उपक्रमाचे आयोजन केले होते. शहीद जवान नितीन राठोड व शहीद संजय राजपूत यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील गोवर्धननगर, लोणार व मलकापूर येथील निवासस्थान परिसराची स्वच्छता करत रांगोळी साकारून शौर्य गुढी उभारण्यात आली. या वेळी शहिदांच्या कुटुंबीयांना अर्थसाह्यही करण्यात आले. या प्रसंगी बागुल यांच्यासह सागर आरोळे, विक्रांत गायकवाड, इम्तियाज तांबोळी, धनंजय कांबळे, दीपक देशपांडे आदींसह कार्यकर्ते तसेच शहीद जवान नितीन राठोड यांचे वडिल शिवाजी, बंधू प्रवीण, मुलगी प्राची उपस्थित होते. शहीद जवान संजय राजपूत यांची आई जिजाबाई, पत्नी सुषमा, बंधू राजेश, मुलगा शुभम व राजपूत कुटुंबीय उपस्थित होते.



संयोजक बागुल म्हणाले, ‘अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, निस्सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर प्रतिकूल निसर्ग आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता ‘छोडो मत उनको’ असे म्हणत शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणाऱ्या भारतीय जवानांमुळेच देश आणि पर्यायाने आपण सुरक्षित आहोत. शहिदांच्या या शौर्याला मानवंदना देऊन त्यांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. या अगोदर शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा जिल्ह्यातील, चंदू चव्हाण यांच्या धुळे जिल्ह्यातील निवासस्थानी व शहीद अशोक कामठे यांच्या पुणे येथील निवासस्थानी शौर्य गुढी उभारली आहे; तसेच नेवासा तालुका येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या निवासस्थानी अन्नदाता गुढीदेखील उभारली होती.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search