Next
उर्वशी सेलिब्रेशन ऑफ लव्ह अँड वुमनहूड
प्रेस रिलीज
Thursday, February 15 | 12:35 PM
15 0 0
Share this story


पुणे : अप्सरा उर्वशी आणि राजा पुरुरावा यांच्या प्रेमकथेला आधुनिक शैलीत सादर करणारी ‘उर्वशी सेलिब्रेशन ऑफ लव्ह अँड वूमनहूड’ ही नृत्यनाटिका मंदिरा मनीष यांनी नुकतीच रंगमंचावर सादर केली.  ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहा’त झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. 

हा कार्यक्रम उत्तम संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा एक सुरेख मिलाप असून, रसिकांसाठी नेत्रसुखदही होता. या कार्यक्रमाचे कथानक कालिदासाच्या ‘विक्रमोर्वशीयम्’मधील अप्सरा उर्वशी आणि राजा पुरुरवा यांच्या प्रचलित अशा कथेवर आधारित आहे. हे नाटक स्त्रियांचे अधिकार, सत्त्व, आत्मनिर्भरता, असीम क्षमता यांची छबी चित्रित करते. तसेच, पुरुष वर्गाला स्त्रीबद्दलची विचारसरणी बदलण्यास, तिला सशक्त व स्वतंत्र बनण्यास प्रयत्न करण्याची दृष्टी देते. त्याचबरोबर तिच्यावर बंधन न लादता, तिच्या अस्तित्त्वासाठी, अधिकारांसाठी मदत करण्यास व तिला योग्य सन्मान देण्यास प्रवृत्त करते. हे नाटक आजच्या पिढीला भारतीय संस्कृती, कला, साहित्य यांची ओळख करून देते. तसेच, त्यांना सात्विक प्रेमाची जाणीव करून देते आणि प्रेम भावनेच्या खऱ्या परिभाषेचे ज्ञान देते.  
    

या कथेत इंद्राच्या इर्षा, लोभ, वासना या वृत्तीला समज देण्यासाठी नरऋषी एक उर्वशी नामक सौंदर्यवतीची उत्पत्ती करतात आणि तिला इंद्राची दासी बनविले जाते. याचवेळी भरतमुनी तिच्याकडून चार वचने घेतात की, कधीही कोणाच्या प्रेमात पडणार नाही, कोणासोबत लग्न करणार नाही, भावनांवर नियंत्रण ठेवणार तसेच, संपूर्ण जीवन हे देवांचे देव इंद्र यांना समर्पित करेल. मात्र उर्वशी सुखाच्या उत्सुकतेने दररोज रात्री पृथ्वीवर उतरून, राजा पुरूरवला भेटायची. यामुळे ती राजाच्या प्रेमात पडली. राजाच्या भेटीने उर्वशीचे जीवन बदलले आणि त्यावेळी तिने असे क्षण अनुभवले, जे तिला जीवनात प्रथमच अनुभवायला मिळाले. या वेळी ती एका बाजूला तिचे प्रेम व दुसऱ्या बाजूला नर ऋषी यांना दिलेली वचने अशा द्विधा परिस्थितीत अडकलेली असते. अशा अनेक रोचक घटनांचा समावेश असलेले हे नाटक प्रेम, त्याग व विश्वास या भावनांचे सात्विक दर्शन घडवते. 

या नृत्यनाट्यातील उर्वशीचे पात्र मंदिरा मनीष यांनी अत्यंत उत्कृष्टपणे सादर केले. त्या वयाच्या दहाव्या वर्षापासून भरतनाट्यम् करत असून,  त्यांनी देशविदेशात अनेक ठिकाणी आपली नृत्यकला सादर केलेली आहे. या बरोबरच पूर्वा सारस्वत व सोनाली सुर्वे-गावडे यांनी अनुक्रमे मेनका आणि रंभा ही पात्रे साकारली आहेत. राजा पुरूरवा यांचे पात्र वृशांक रघटाटे यांनी साकारले.
 
प्रसिध्द संगीतकार आलाप देसाई यांनी नृत्यनाटिकेला उत्तम संगीत दिले आहे. आलाप यांनी संगीतातील विविध प्रकारच्या शैलींचा वापर करून, त्यांच्या अनुभवाच्या जोरावर उर्वशीला सुंदररित्या साकारले आहे. नृत्यदिग्दर्शन वैभव आरेकर यांनी केले असून, दिग्दर्शन सुशांत जाधव यांचे आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link