Next
‘कल्याण ज्वेलर्स’तर्फे मर्सिडीझ जिंकण्याची सुवर्णसंधी
प्रेस रिलीज
Friday, April 06, 2018 | 03:10 PM
15 0 0
Share this story

त्रिशुर :  कल्याण ज्वेलर्सने अक्षय्य तृतीयेपर्यंत वैशिष्ट्यपूर्ण जागतिक प्रमोशन करायचे ठरवले असून, त्यामध्ये ग्राहकांना कल्याण ज्वेलर्सच्या शोरूममध्ये केलेल्या खरेदीवर मर्सिडिझ-बेंझ सीएलए जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे प्रमोशन भारत, यूएई, कतरा, कुवेत व ओमान येथे नऊ जून २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे.

भारत, दुबई, दोहा, मस्कत व कुवेत सिटी येथे होणाऱ्या ड्रॉमध्ये देशनिहाय विजेत्यांची निवड केली जाईल. या मोहिमेत भारतातून १०, यूएईतून सात, कतारमधून तीन, ओमानमधून तीन व कुवेतमधून दोन विजेते निवडले जातील. या मोहिमेतील विजेत्यांची नावे कल्याण ज्वेलर्सच्या अधिकृत वेबसाइटवर व कंपनीच्या अधिकृत फेसबुक पेजवर जाहीर केली जातील.

ग्राहकांना किमान पाच हजार रुपयांची खरेदी करून या ड्रॉमध्ये सहभागी होता येईल. सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांना एक कूपन दिले जाईल, तर हिरे, पैलू न पाडलेले, मौल्यवान धातू व पोलकी दागिने खरेदी करणाऱ्यांना दोन कूपन दिली जातील. या मोफत कूपनबरोबरच, स्टडेड ज्वेलरी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक २५ हजार रुपयांच्या खरेदीवर मोफत सोन्याची नाणी मिळू शकतील.

ही सवलत अलीकडेच दाखल करण्यात आलेल्या ‘मुहुरत’ या वेडिंग ज्वेलरीबरोबरच कल्याण ज्वेलर्सच्या सर्व कलेक्शनवर लागू असेल. ब्रायडल ज्वेलरीचे हे महागडे कलेक्शन देशातील विविध संस्कृती व समाजांसाठी सादर करण्यात आले आहे.

कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी. ए. कल्याणरामन म्हणाले, ‘कल्याण ज्वेलर्सने उत्तम मूल्य देणारी खरेदी करता यावी व त्यांच्या आकांक्षा पूर्ण करता याव्यात यासाठी खरेदीचा परिपूर्ण अनुभव देण्यावर नेहमी भर दिला आहे. अक्षय्य तृतीयेपूर्वीची ही संधी आमच्या ग्राहकांना आवडेल, असा विश्वास आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या हंगामादरम्यान हे प्रमोशन करण्यात येत आहे आणि ग्राहकांना कल्याण ज्वेलर्समध्ये केलेल्या दागिन्यांच्या खरेदीवर मोफत मर्सिडिझ-बेंझ सीएलए कार जिंकण्याची संधी मिळणार आहे.’

हे प्रमोशन तामिळनाडू व पाँडिचेरी वगळता, कल्याण ज्वेलर्सच्या जगभरातील सर्व आटलेटसाठी लागू आहे. १० भारतीय विजेत्यांना मर्सिडिझ-बेंझ सीएलए २०० जिंकता येईल, तर मध्य पूर्वेतील विजेत्यांना मर्सिडिझ-बेंझ सीएलए २५० मॉडेल जिंकता येईल.

कल्याण ज्वेलर्सविषयी :
केरळ राज्यातील त्रिशूर येथे मुख्यालय असलेली कल्याण ज्वेलर्स ही भारतातील व जीसीसीतील एक सर्वात मोठी दागिने उत्पादक वितरक आहे. कंपनीला टेक्स्टाइल व्यापार, वितरण व घाऊक विक्री यातील शतकभराचा अनुभव आहे. १९९३मध्ये पहिले ज्वेलरी शोरूम सुरू केल्यापासून कल्याण ज्वेलर्सने भारतात अंदाजे दोन दशके आपले स्थान निर्माण केले आहे.

‘कल्याण’ २०१३पासून ‘जीसीसी’मध्ये कार्यरत आहे व यूएई, कतार, कुवेत व ओमान येथेही व्यवसाय करत आहे. कंपनीने गुणवत्ता, पारदर्शक दर व नावीन्य या बाबतीत या उद्योगात बेंचमार्क निर्माण केला आहे. ‘कल्याण’मध्ये सोने, हिरे व मौल्यवान धातूंच्या पारंपरिक व आधुनिक दागिन्यांचे असंख्य प्रकार उपलब्ध असून, ते ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करतात. आज, कल्याण ज्वेलर्सची भारतात व पश्चिम आशियात १२१ शोरूम आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link