Next
‘दर्जेदार वैद्यकीय सुविधा स्वस्तात सर्वत्र उपलब्ध व्हाव्यात’
मेडइन्स्पायर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, February 15, 2019 | 01:56 PM
15 0 0
Share this story

ठाणे : ‘जीवनशैलीशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असून, एकीकडे हे आव्हान पेलताना आपल्याकडे दर्जेदार वैद्यकीय सुविधा स्वस्तात सर्वत्र उपलब्ध होणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. म्हणाले. सोशल मीडियावरील चुकीचे आरोग्य सल्ले रोखणेही आवश्यक असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे आयोजित मेडइन्स्पायर या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. हा कार्यक्रम १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झाला. या प्रसंगी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर जयवंत सुतार, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार, पालिका आयुक्त रामास्वामी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील, शिवानी पाटील, डॉ. नंदिता पालशेतकर उपस्थित होते.

या प्रसंगी राज्यपालांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्ते ‘दी फ्युचर स्टँडस टुडे’ या स्मरणिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यपाल म्हणाले, ‘एकीकडे वैद्यकीय तंत्रज्ञान आणि आरोग्य सुविधांमुळे आयुष्यमर्यादा वाढत चालली असली, तरी आपल्याकडे दर्जेदार आरोग्य सेवा अजूनही महागडी आहे आणि सर्वत्र सारख्या प्रमाणात उपलब्ध नाही. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन प्रधानमंत्री मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मोदीकेअर’ या जगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य विमा योजनेमुळे १०० दशलक्ष कुटुंबाना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळाले.’

‘जगातील बहुसंख्य देशांमधील लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील लोकसंख्या वयाने तरुण आहे; मात्र या युवा पिढीतही जीवनपद्धतीशी मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या वाढत्या आजारांमुळे आरोग्यविषयक आव्हान आपल्यासमोर उभे ठाकले आहे. दर वर्षी आपल्या देशात एक दशलक्ष लोक मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या व्याधींनी मरण पावतात, हे पाहिले म्हणजे मधुमेहावर संशोधन करून प्रभावी औषध निर्माण करण्याची किती निकड आहे त्याची कल्पना येते. भारतातील ज्येष्ठांची, वृद्धांची संख्याही २०५०मध्ये ३४० दशलक्ष होऊन आपण ती अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येलाही मागे टाकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात खास वृद्धांच्या आरोग्य आणि समस्यांवर उपचार करणारी अनेक रुग्णालये उभारावी लागतील,’ असे त्यांनी सांगितले.  

‘लठ्ठपणा हाही मधुमेह, हृदयरोग तसेच काही प्रकारच्या कर्करोगाचे कारण बनला आहे. सिप्ला कंपनीचे अध्यक्ष डॉ. युसुफ हमीद यांनी मध्यंतरी प्रतीजैविकांच्या अतिसेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाकडे लक्ष वेधले होते, हे सर्व पहाता वैद्यकीय क्षेत्राने यावर उपाय योजण्याची गरज आहे. सोशल मीडिया झपाट्याने लोकप्रिय झाला आहे. याद्वारेही प्रचंड प्रमाणावर चुकीचे आरोग्य सल्ले आणि बोगस उपचार सांगितले जात आहेत. अशा ‘डॉक्टर सोशल मीडिया’मुळेही समाजाच्या स्वास्थाला हानी पोहचत आहे, हे पाहता वैद्यक क्षेत्राने योग्य माहिती सोशल मीडिया’वर जाईल हे पाहिले पहिजे,’ असे राज्यपालांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link