Next
‘गोदरेज’ तरुणांना देणार कौशल्य प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Tuesday, July 24, 2018 | 03:59 PM
15 0 0
Share this story

मुंबई : गोदरेज अप्लायन्सेसतर्फे समूहाच्या ‘गोदरेज दिशा’ उपक्रमातील व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भारतातील वंचित तरुणांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याच्या हेतूने, तसेच त्यांना रोजगाराच्या दृष्टीने कौशल्यविकास प्रशिक्षण देणार असून, सरकारच्या राष्ट्रीय कौशल्यविकास अभियानाच्या (प्रधानमंत्री कुशलविकास योजना) अनुषंगाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ५५ हजार तरुणांना कुशल उपकरण सेवा अभियंते म्हणून प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट गोदरेज अप्लायन्सेसचे आहे.

भारताचा आर्थिक विकास पाहता पुढील दशकांत रोजगाराच्या बऱ्याचशा संधी उपलब्ध होऊ शकतात आणि त्यातील बहुतांश रोजगार हे कौशल्यावर आधारित असतील. तथापि, सध्याच्या एकूण कर्मचारीवर्गापैकी केवळ २-४ टक्के लोकांनाच औपचारिक कौशल्य प्रशिक्षण मिळाले आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे. कौशल्य प्रशिक्षणामुळे बेरोजगारीची समस्येचे निराकारण करण्यास सहाय्यभूत ठरेल आणि हीच भारतातील बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. प्रसिद्ध प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने गोदरेज अप्लायन्सेस ‘गोदरेज दिशा’च्या माध्यमातून उच्च दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन कुशलतेची ही समस्या काही अंशी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. याद्वारे शहरी, तसेच ग्रामीण भागातील तरुणांना उपकरण सेवा तंत्रज्ञ म्हणून रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

गोदरेज अप्लायन्सेसने २०१२मध्ये ‘गोदरेज व्होकेशनल ट्रेनिंग स्कूल’ (जीव्हीटीएस) सुरू केले होते, त्यांची संख्या आता ३५वर पोहोचली असून, ३७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या प्रशिक्षित करण्यात आले आहे. येत्या तीन वर्षांत आणखी १५ ट्रेनिंग स्कूल सुरू करून अतिरिक्त १८ हजार शहरी आणि ग्रामीण युवकांना कुशल बनविण्याचे लक्ष्य कंपनीचे आहे. वर्षागणिक केवळ प्रशिक्षणाचे प्रमाण वाढवून नव्हे, तर प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवून परिणाम साधण्यावर कंपनीचा भर आहे.

हा तीन महिन्यांचा कोर्स असून, विविध तंत्रज्ञानाच्या बेसिक थेअरीपासून सेवा, दुरुस्ती आणि उपकरण बसविण्यापर्यंत सर्व प्रकारचे गुणवत्तापूर्ण तांत्रिक प्रशिक्षण तरुणांना दिले जाते. यशस्वी विद्यार्थी हे ‘गोदरेज सर्टिफाईड टेक्निशिअन’ म्हणून ओळखले जातात आणि ‘गोदरजे स्मार्ट केअर बडीज्’ म्हणून त्यांना उपकरणाच्या विक्रीनंतरच्या सेवा देणाऱ्या टीममध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते. अशाप्रकारे रोजगारक्षमता आणि रोजगार पुरविले जातात.

गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, ‘तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अपेक्षा या दृष्टीने आमच्या उद्योगात लक्षणीय बदल होत आहे आणि त्याच अनुषंगाने कुशल तंत्रज्ञानाची मागणीही त्याच प्रमाणात वाढत आहे. एक जबाबदार कंपनी म्हणून २०२०पर्यंत आमच्या अप्लायन्स उद्योगात ५५ हजार कुशल तंत्रज्ञांचा समावेश करण्याचा गोदरेज अप्लायन्सेसचे उद्दिष्ट आहे. आमच्या ‘दिशा’ उपक्रमाद्वारे विशेष करून वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन बेरोजगाराची दरी कमी करण्याचा प्रयत्न आहे.’

गोदरेज अप्लायन्सेसचे सर्व्हिस हेड रवी भट म्हणाले, ‘सर्व ग्राहकांच्या दृष्टीने विक्रीनंतरची सेवा ही अतिशय किचकट भाग ठरत आहे. पुरेसे तंत्रज्ञ नसल्याने ठराविक काळानंतर सेवा देणे जिथे आवश्यक आहे, त्या सर्व उत्पादनांच्या व्यवसायावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. उद्योगातील कुशल तंत्रज्ञांची ही कमतरता जितकी भरून काढता येईल, तितकी भरून काढणे महत्त्वाचे आहे. खुद्द गोदरेज अप्लायन्सेसलाच २०२०पर्यंत जवळपास ७००० तंत्रज्ञांची गरज भासणार आहे. त्याचप्रमाणे, विकासाची सध्याची तीव्र गती पाहता या उद्योगामध्ये तंत्रज्ञांची मागणी त्याच प्रमाणात वाढत आहे. सद्यस्थितीत रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग उद्योगात सुमारे ५० टक्के प्रशिक्षित उमेदवार कार्यरत आहेत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link