Next
‘उन्मत्त’ २२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार
प्रेस रिलीज
Saturday, February 16, 2019 | 04:32 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘२४ एफएस यांची निर्मिती असलेला ‘उन्मत्त’ हा चाकोरीबाह्य चित्रपट २२ फेब्रुवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘स्लीप पॅरालिसीस’चा अनाकलनीय अनुभव स्वत: अनुभवल्यानेच माझ्या अनुभवावर आधारीत या चित्रपटाची कथा लिहिली आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. स्वप्नांचे आभासी जग आणि प्रत्यक्ष जग, जगाची उत्पत्ती, देव अन् दानव, प्रेम आणि प्रतिशोध या सर्व संकल्पनांचा उहापोह या चित्रपटात असून, हॉलीवूडपटाच्या धर्तीवर बनलेला हा सायन्स फिक्शन मराठी चित्रपट, वेगळ्या विषयावरचे चित्रपट पाहणाऱ्या मराठी-अमराठी प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल,’ असा विश्वास दिग्दर्शक महेश राजमाने यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

‘कथेचे बीज आणि बाज ही या चित्रपटाची जमेची बाजू आहेच, पण यात वापरले गेलेले स्पेशल इफेक्ट्स आणि अंडरवॉटर सीन्स हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहेत. हा अनुभव प्रत्यक्ष पडद्यावर घेताना एक नवीन जग प्रेक्षकांना उलगडेल,’ असे राजमाने यांनी सांगितले.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत आरुषी, विकास बांगर, पूर्णिमा डे, प्रसाद शिक्रे, संदीप श्रीधर व संजय ठाकूर हे असून, प्रत्येक पात्र जिवंत करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे. राजेंद्र खैरे हे या चित्रपटाचे निर्माते असून, शहाजी शिंदे सहनिर्माते आहेत. लेखन व दिग्दर्शन महेश राजमाने यांचे तर संवादासाठी प्रशांत जोशी यांचे सहकार्य लाभले आहे. चित्रपटातील गीते शिवाजी जोशी, गावडा व महेश राजमाने यांनी लिहिली असून, रूपाली मोघे आणि जसराज जोशी यांनी गायली आहेत. चित्रपटातली गुढता आणि थरारकता अधोरेखित करणारे संगीत व पार्श्वसंगीत युगंधर देशमुख यांनी दिले आहे. इंद्रनील नुक्ते आणि स्वराज घाडगे यांनी छायचित्रणाची बाजू संभाळली आहे.

‘चित्रपटाच्या प्रसिद्धी प्रमुख सुनंदा काळूसकर असून, सोशल मीडिया मॅनेजर श्रीनिवास कुलकर्णी, तर कुमार गावडा हे या चित्रपटाचे बिजनेस हेड आहेत. २२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘उन्मत्त’ हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल,’ असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search