Next
स्वर प्रभाकर
BOI
Thursday, July 25, 2019 | 10:40 AM
15 0 0
Share this article:

गोवा ही कलेची भूमी आहे. या गोयंच्या मातीतून अनेक कलाकार घडले आहे. परिपूर्ण मैफलीचा आनंद त्यांच्या गाण्यातून मिळतो. कोणतेही सत्र असले, तरी मैफल रंगविण्यात त्यांची हातोटी आहे, अशी गुणवैशिष्ट्ये सांगत मंगला खाडिलकर यांनी पं. प्रभाकर कारेकर यांचा सुरेल जीवनप्रवास ‘स्वर प्रभाकर’मधून कथन केला आहे.

उत्तर गोव्यातील जुवे हे कारेकरबुवांचे जन्मगाव. पुढे वडिलांनी मडगावला स्थलांतर केल्यानंतर बुवा व त्यांचे भाऊ शाळेत जाऊ लागले. तेथील न्यू इरा हायस्कूलमध्ये त्यांना शिक्षणाबरोबर कलागुणांमध्ये गती मिळाली. उत्तम फुटबॉलपटू ते गायक हा प्रवास तेथूनच सुरू झाला. अनोळख्या मुंबईत आल्यानंतर पं. सुरेश हळदणकर यांचे शिष्यत्त्व पत्करले. त्यांच्याकडे १२ वर्षे गायनाचे धडे गिरवल्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिक्षण घेतले. त्यांच्याबरोबर दौरे केले. पु. ल. देशपांडे यांचा सहवास मिळाला. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे आशीर्वाद व राजाश्रय मिळाला. सवाई गंधर्व महोत्सव, पं. कारेकर यांचे स्नेही या आठवणींसह त्यांचा गानप्रवास येथे वाचायला मिळतो.

पुस्तक : स्वर प्रभाकर
लेखक : मंगला खाडिलकर
प्रकाशक : कौशिक प्रकाशन 
पाने : १७६
किंमत : २७० रुपये
     
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search