Next
ब्राह्मण बिझनेस नेटवर्कच्या पंढरपुरातील प्रदर्शनात ७० लाखांहून अधिक उलाढाल
BOI
Wednesday, January 30, 2019 | 02:05 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : पंढरपुरात ब्राह्मण बिझनेस नेटवर्कच्या (बीबीएन) माध्यमातून यंदा भरलेल्या प्रदर्शनात सुमारे ७० लाख रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे. त्यातून स्थानिक व्यावसायिकांना चांगला फायदा झाला आहे. पंढरपुरातील हे तिसरे प्रदर्शन होते. विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांनी एकत्र येऊन उपक्रम राबविल्यास आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्यास किती फायदेशीर ठरू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

‘बीबीएन’चे पंढरपूर येथील को-ऑर्डिनेटर विश्वास आराध्ये यांनी पंढरपूर येथे भरवलेल्या प्रदर्शनाबद्दल माहिती सांगितली. ते म्हणाले, ‘पंढरपुरात आम्ही गेल्या तीन वर्षांपासून प्रदर्शन भरवत आहोत. येथील समाजबांधवांचा या नेटवर्कच्या माध्यमातून चांगला व्यवसाय होत आहे. या माध्यमातून हे व्यावसायिक कायम एकमेकांच्या संपर्कात राहतात. त्यांचा त्यांच्या व्यवसायात वाढ होण्यास चांगला फायदा होतो.’

या वेळच्या प्रदर्शनात सुधा बडवे यांनी विणकामाचा स्टॉल लावला होता. विणकामाची कला नवीन पिढीला माहिती व्हावी आणि विणकामाच्या वस्तू विकून उत्पन्न मिळावे, म्हणून आपण स्टॉल लावल्याचे बडवे यांनी सांगितले. सचिन कुलकर्णी या छायाचित्रकाराने लावलेल्या स्टॉलवर ग्राहकांना वेडिंग फोटोग्राफीची माहिती मिळाली. त्यालाही चांगला व्यवसाय मिळाल्याचे त्याने सांगितले.

सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केला, तर नक्की फायदाच होतो, याचे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क हे एक उदाहरण. पुण्यात सुरू झालेले ब्राह्मण बिझनेस नेटवर्क केवळ पुण्यापुरते मर्यादित न राहता त्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील समाजबांधवांना व्यवसायवृद्धीसाठी या नेटवर्कचा फायदा झाला आहे.

पुण्यात नितीन कुलकर्णी, जितेंद्र कुलकर्णी, विनायक जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्राह्मण बिझनेस नेटवर्क संस्थेची स्थापना केली. समाजबांधवांनी एकत्र येऊन व्यवसाय केला, तर व्यवसायात वाढ होईल आणि सर्वांनाच फायदा होईल, या विचाराने ब्राह्मण समाजातील व्यावसायिकांना एकत्र आणणे हा त्यामागचा उद्देश होता. महाराष्ट्रातील २७ प्रमुख शहरांमध्ये या संस्थेच्या शाखा सुरू करण्यात आल्या असून, आणखीही काही शहरांत शाखा सुरू केल्या जाणार आहेत. ही संस्था ‘ना नफा...ना तोटा’ या तत्त्वावर कार्य करते. कोणाकडूनही फी घेतली जात नाही. 

या माध्यमातून सोशल मीडियात एखादी जाहिरात केली, तर ती जाहिरात सत्तावीस ठिकाणी जाते. त्यामुळे त्या-त्या भागातील व्यावसायिकांना त्याचा फायदा होत राहतो. आतापर्यंत या नेटवर्कच्या माध्यमातून सुमारे तीनशे कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे. 

दर वर्षी साधारण वेगवेगळ्या शहरांत चार ते पाच दिवस प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनात त्या-त्या शहरातील ब्राह्मण समाजातील व्यावसायिक आपले स्टॉल लावतात. या चार-पाच दिवसांच्या काळात व्यावसायिकांना चांगला व्यवसाय मिळतो. 

समाजबांधवांनी एकत्र येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे नेटवर्क उभारून व्यवसायवृद्धी करण्याचे चांगले उदाहरण म्हणून या प्रयोगाकडे पाहता येईल.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anuradha vaidya. About 199 Days ago
BBN च्या माध्यमातून केलेल्या ह्या उत्कृष्ट कार्याला माना चा मुज़रा ।
0
0
SHIRISH ACHYUT PATHAK About 200 Days ago
एक नंबर ,युनिटी,विश्वास, टिम वर्क,जबरदस्त बिझनेस ,आईड्या,
0
0

Select Language
Share Link
 
Search