Next
‘अवयवदानाने आठ, तर पेशीदानाने ५० व्यक्तींना मिळते जीवदान’
विज्ञान परिषदेतर्फे आयोजित व्याख्यानात प्रीती दामलेंची माहिती
प्रेस रिलीज
Wednesday, May 22, 2019 | 05:04 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘अवयवदानाची जनजागृती करणे आज खूप महत्त्वाचे आहे. अवयवदानाचे दोन प्रकार असतात. यात एक संपूर्ण अवयव आणि दुसरे पेशीदान. अवयवदानाने आठ, तर पेशीदानाने ५० लोकांचे जीव वाचू शकतात. अवयदानामध्ये दोन मूत्रपिंडे, यकृत, फुप्फुसे, हृदय आणि स्वादुपिंड या अवयवांचा समावेश होतो. अवयवातील एक पेशींचा समूह ज्याने तुम्ही ५० लोकांचे जीव वाचू शकतो. यामध्ये डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा, स्नायुबंध, रक्तवाहिनी, त्वचा आणि हाडे याचा समावेश होतो,’ अशी माहिती समवेदना फाउंडेशनच्या सीईओ प्रीती दामले यांनी दिली. 

मराठी विज्ञान परिषदेतर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर प्रीती दामले ‘अवयवदानाचे महत्त्व’ या विषयावर बोलत होत्या. सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. शर्मिला पाथे, डॉ. धनंजय चांदककर, विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., संजय मालती कमलाकर आदी या वेळी उपस्थित होते.

दामले म्हणाल्या, ‘जिवंतपणी दात्याच्या शरीरातून एक मूत्रपिंड, एक तृतीयांश यकृत, स्वादुपिंड आणि त्वचा दान करता येते. मेंदू मृत अवस्था म्हणजे ज्यात रुग्णाचे कृत्रिम श्वासोच्छवासाशिवाय श्वास घेऊ शकत नाही आणि कालांतराने हृदयही बंद होते. या अवस्थेतील रुग्णाचे दोन मूत्रपिंडे, यकृत, फुप्फुसे, हृदय, स्वादुपिंड, डोळ्यांच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा आणि त्वचा दान करता येते. या परिस्थितीत अवयवदान करण्यास कायद्याने मान्यता दिली आहे. मृतावस्थेत रुग्णाच्या डोळ्यांच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा आणि त्वचा दान करता येते. या सर्व अवस्थेत महत्त्वाचे म्हणजे हे अवयव सदृढ असणे खूप गरजेचे आहे, तरच त्याचा वापर दुसऱ्या प्राप्तकर्त्याला होऊ शकतो. व्यक्तींना अवयवदान करायचे असल्यास ती व्यक्ती अर्ज भरू शकते आणि डोनरकार्ड आपल्या जवळ बाळगू शकते.’

‘अवयवदानाबद्दल समाजात जागृती करणे गरजेचे आहे. अवयवदानात पैशांची देवाणघेवाण होत नाही. दात्याचे नाव आणि प्राप्तकर्त्याचे नाव गुपित ठेवले जाते. काही देशांत मेंदू मृतावस्थेत आणि मृत्युमुखी अवस्थेत अवयवदान करणे बंधनकारक असतो. भारतात सध्या तरी हा कायदा नाही; पण इतरत्र देशात रुग्णाचा उपचारावर सरकार खर्च करत असेल आणि त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याला अवयवदान करणे बंधनकारक आहे,’ असे डॉ. चांदककर यांनी सांगितले.

संजय मा. क. यांनी प्रस्तावना केली. पाहुण्यांचा परिचय दीपक अडगावकर यांनी करून दिला. विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय आर. आर. यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search