Next
‘एनेमटेक कॅपिटल’ची पुण्‍यातील ‘स्नॅपर’मध्‍ये गुंतवणूक
प्रेस रिलीज
Saturday, May 18, 2019 | 05:49 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पुणेस्थित स्नॅपर फ्युचर टेक या कंपनीने अमेरिकास्थित एनेमटेक कॅपिटल इन्क. यांच्यासोबत भागीदारी करत असल्याची घोषणा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत १७ मे २०१९ रोजी केली. ‘स्नॅपर’पासून भारतात ब्लॉकचेन क्रांतीला चालना देत आहे.

या प्रसंगी बोलताना महापौर टिळक म्हणाल्या, ‘ब्लॉकचेनला सर्वाधिक मागणी आहे आणि या कौशल्यासाठी मोबदलाही फार मिळतो, शिवाय पुणे हे आयटीहब असल्याने या क्षेत्रात अग्रणी व नेतृत्वस्थानी असण्यासाठीच्या सर्व क्षमता या शहरात आहेत. कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण हे विकासातील महत्त्वाचे मुद्दे आहेत.’ 

आयटी तज्ज्ञ आणि ३९ पुस्तकांचे लेखक डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, ‘उमेदवारांसाठी ब्लॉकचेन क्षेत्रात प्रवेश करण्याचा हा उत्तम काळ आहे, ही त्यांच्यासाठी आयुष्य बदलवणारी संधी असू शकते. सुयोग्य कौशल्ये असलेल्या उमेदवारांना स्वप्नवत संधी देणाऱ्या ईआरपी आणि इंटरनेट क्रांतीशी ते ब्लॉकचेन क्रांतीची तुलना करतात. ब्लॉकचेन क्रांती इंटरनेटरइतकीच किंबहुना त्याहून मोठी क्रांती असेल.’

एनेमटेक कॅपिटल इन्क.चे स्वेन डे वॉचर म्हणाले, ‘सातत्याने अपग्रेड करत राहणे हा यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण, तंत्रज्ञान अत्यंत वेगाने बदलत आहे आणि जे आजही पारंपरिक तंत्रज्ञानात अडकून पडले आहेत, त्यांना योग्य संधींचा लाभ घेण्यातही अडचणी येतील. त्यामुळे, सध्या या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्सनाही भविष्यातील तंत्रज्ञानासाठी स्वत:ला अपग्रेड करावे लागेल.’

एनेमटेक कॅपिटल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अवनिश गुप्ता म्हणाले, ‘ब्लॉकचेन हे विश्वासावर आधारित तंत्रज्ञान आहे. ब्लॉकचेन या वैश्विक माहिती सुविधेच्या माध्यमातून क्रिप्टोग्राफिकली सुरक्षित, अक्षय, ज्यात कोणतीही छेडछाड करणे शक्य नाही, निश्चित वेळ असणाऱ्या वातावरणात माहितीचे आदानप्रदान करता येते. त्यामुळे, सत्य परिस्थितीचेच रूप असलेली परिसंस्था निर्माण होते. इंटरनेट क्रांतीचे लाभ आम्ही दवडले होते. त्यामुळे, स्नॅपरमध्ये गुंतवणूक करून अनोख्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर स्वार होत असल्याचा आम्हाला आनंद आहे.’

‘ब्लॉकचेनच्या माध्यमातून आम्ही इंटरनेट ऑफ इंटरअॅक्शन अॅंड इन्फॉर्मेशन या टप्प्यापासून इंटरनेट ऑफ व्हॅल्यूच्या दिशेने जात आहोत. जिथे कोणत्याही मध्यस्थाच्या मदतीशिवाय कोणीही विश्वास प्रस्थापित करू शकेल आणि प्रत्यक्ष वेळेत रकमेचे मोल एक्सचेंज करता येईल. ब्लॉकचेनमुळे इंटरनेट हे खुले माध्यम बनले आहे आणि प्रामाणिकता व पारदर्शकता जपणारी कोणतीही संस्था ब्लॉकचेनवर असू शकेल,’ असे ‘स्नॅपर’चे संस्थापक प्रशांत सुराणा म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search