Next
‘लढवय्ये ते लढले... हल्लेखोरांसमोर नच नमले’
पुणेकरांनी कीर्तनातून अनुभवला २६/११ चा थरार
BOI
Wednesday, November 28, 2018 | 04:04 PM
15 0 0
Share this story

राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. विश्वासबुवा कुलकर्णी यांनी कीर्तनातून ‘२६/११ची वीरगाथा’ उलगडली.

पुणे :‘२६/११ ची वीरगाथा, ऐकोनी आदरे झुकेल माथा.... लढवय्ये ते लढले, हल्लेखोरांसमोर नच नमले...’ अशा शब्दांत मुंबई शहरावर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा थरार कीर्तनातून ऐकताना उपस्थितांच्या  अंगावर रोमांच उभे राहिले. राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. विश्वासबुवा कुलकर्णी यांनी कीर्तनातून ‘२६/११ची वीरगाथा’ उलगडली.

राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. विश्वासबुवा कुलकर्णी
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि प्रबोधन भारती यांच्या वतीने ‘२६/११ची वीरगाथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील एम. ई. एस सभागृहात झालेल्या कार्यक्रमात निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले,  पोलीस निरीक्षक अप्पा शेवाळे,  डॉ. मिलींद भोई, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प.विश्वासबुवा कुलकर्णी, नारद मंदिराच्या सचिव ह. भ. प.जयश्री देशपांडे, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते. या वेळी पोलिसांच्या पिडीत कुटुंबियांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून विशेष देणगी देण्यात आली. 

या वेळी बोलताना भूषण गोखले म्हणाले, ‘सर्व भारतीयांना प्रेरणा देणारा २६ /११ हा दिवस आहे. आपण इतिहासात डोकावले, तर कळेल आपणच आपले शत्रू आहोत. आपली गुप्तहेर यंत्रणा सक्षमपणे काम करीत असताना आपलेच लोक शत्रूला माहिती पुरवितात. देशाचे रक्षण हे आपल्यादृष्टीने महत्त्वाचे असले पाहिजे. पोलिसांना सहकार्य केले, नियम पाळले तर तीदेखील देशभक्ती आणि शहीद पोलिसांना खरी श्रद्धांजली असेल.’ 

विश्वासबुवा कुलकर्णी म्हणाले, ‘सामान्य माणसाच्या मनात पोलिसांबद्दलची भावना फारशी चांगली नाही. सामान्य माणसाच्या मनातील पोलिसांबद्दलची ही भावना बदलावी, २६/ ११ हल्ल्याच्या वेळी पोलिसांनी दाखविलेले अतुलनीय शौर्य लोकांच्या समोर यावे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.’  


कुलकर्णी यांना कानिफनाथ घैसास (तबला), बापू सुतार (हार्मोनिअम), गंधार जोगळेकर (झांज) यांनी साथसंगत केली. प्रा. रुपाली मावळे यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. संगीता मावळे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link