Next
‘शहर शेती’कार्यशाळेचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, May 31, 2018 | 04:02 PM
15 0 0
Share this article:

पुणे :  अन्नदाता आणि वनराई यांच्या वतीने  ‘शहर शेती’ ‘कचरा-सांडपाणी घरच्या घरी जिरवूया, सुरक्षित-विषमुक्त अन्न पिकवूया, या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक शहर शेतीच्या उपासक ज्योती शहा आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. राहुल मराठे हे या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी, दोन जून रोजी दुपारी अडीच वाजता मित्र मंडळ चौक, पर्वती येथील वनराईच्या कार्यालयात इको हॉल येथे ही कार्यशाळा होणार आहे.

शहरांमध्ये आज कचऱ्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. सांडपाण्याच्या समस्येनेसुद्धा चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे.  प्रदूषित पाणी पशू -पक्षी आणि  माणसाच्या आरोग्यासाठी घातक झाले आहे. त्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण करून, अधिकाधिक कचरा घरच्या घरी जिरविण्याची गरज सध्या भासत आहे. शेतमालावर फवारली जाणारी कीटकनाशके आणि अन्नधान्यातील भेसळ यामुळे एकूणच मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी शहरवासियांनी आपले अन्न आपणच पिकवण्याचा  पर्याय निर्माण केला पाहिजे. इमारतीच्या छतावर, बाल्कनीत आणि सभोवतालच्या परिसरात भाजीपाला-अन्नधान्य आणि वनस्पतीची लागवड केल्यास त्याठिकाणी ओल्या कचऱ्यासह अनेक टाकाऊ वस्तू उपयोगात आणता येऊ शकतात. अशा अनेक मुद्द्यांवर मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 
 
कार्यक्रमाविषयी : 
‘शहर शेती’ कार्यशाळा 
ठिकाण : इको हॉल, वनराई कार्यालय, मित्र मंडळ चौक, पर्वती, पुणे 
वेळ : शनिवार, २ जून, २.३० वाजता 

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 
संपर्क : श्रीनिवास खेर 
       ९८२३० ६६६४६ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Swati Markale, Ramchandra Markale About
I registered my name& as well as talked with Mr Kher. I we are confirmed.think
0
0

Select Language
Share Link
 
Search