Next
‘महिंद्रा’तर्फे ‘टीईक्यूओ’ सादर
प्रेस रिलीज
Friday, June 14, 2019 | 01:12 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : महिंद्रा पार्टनर्स या महिंद्रा ग्रुपच्या प्रायव्हेट इक्विटी विभागाने ‘टीईक्यूओ’ ही तंत्रज्ञान आधारित मालमत्ता देखभाल कंपनी सादर केली आहे. भारत आणि जगभरातील रिन्युएबल एनर्जी म्हणजेच अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना ऑप्टिमायझेशन सोल्युशन्स पुरवली जाणार आहेत. महिंद्रा पार्टनर्सतर्फे सध्या महिंद्रा सस्टेन या भारतातील आघाडीच्या सोलार ईपीसी कंपनीसह ग्रुपच्या क्लीनटेक विभागाचे नियोजन केले जाते.

‘टीईक्यूओ’ ग्राहकांना अत्याधुनिक अॅसेट मॉनिटरिंग सोल्युशन्स, कमाल ऊर्जानिर्मितीचे अल्गोरिदम, सुस्पष्ट रोबोटिक्स, ऑटोमेटड ड्रोन्स, ऑन-ग्राउंड ऑपरेशन्स आणि मेंटनन्स फ्लीट्स अशा अत्याधुनिक सेवा देणार आहे. त्याचप्रमाणे, अॅसेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस, तांत्रिक तज्ज्ञता आणि परफॉर्मन्स अॅनालिसिस सेवाही दिल्या जातील.

कंपनीचे ‘टीईक्यूओ’ हे नाव टेक्नॉलॉजी, क्वॉलिटी आणि ऑपरेशनन्स यांपासून बनले आहे. महिंद्रा लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, बिग डेटा, रोबोटिक्स, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत अधिकाधिक परतावा मिळवण्यात रिन्युएबल एनर्जी संसाधनाच्या मालकांना महिंद्रा ‘टीईक्यूओ’चे साह्य लाभणार आहे.

‘सस्टेनमधील ओअॅंडएम विभाग ते एक स्वतंत्र व्यवसाय विभाग आणि आता ‘टीईक्यूओ’ ही एक स्वतंत्र ओळख. ‘टीईक्यूओ’ची मागील सहा वर्षांतील ही यशस्वी प्रगती पाहून मला आनंद होतो. डिजिटायझेशनमुळे शाश्वत तंत्रज्ञान आणि ग्राहककेंद्रितता अत्यंत महत्त्वाच्या बाबी ठरल्या आहेत. जगभरात तंत्रज्ञानाधारित रिन्युएबल एनर्जी आणि ओअॅंडएम क्षेत्रात ‘टीईक्यूओ’ नेतृत्वस्थान मिळवेल, असा मला विश्वास आहे,’ असे महिंद्रा पार्टनर्सचे मॅनेजिंग पार्टनर पराग शहा म्हणाले.

‘अवघ्या सहा वर्षांच्या कालावधी फोर-जीडब्ल्यूपी प्रकल्प अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञान उत्पादने आणि सेवांची वाढती परिसंस्था, त्याला सखोल डोमेन तज्ज्ञतेसोबत असलेले दमदार टीमचे पाठबळ यामुळे ‘टीईक्यूओ’मध्ये आम्ही अतिशय अभिमानाने जागतिक अस्तित्वासह एक सर्वाधिक सर्वसमावेशक अशी रिन्युएबल एनर्जी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी उभारत आहोत,’ असे महिंद्रा ‘टीईक्यूओ’चे सीईओ स्टीव्ह ओडक म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search