Next
पर्यावरणदिनी मेघालय करणार १५ लाख झाडे लावण्याचा विक्रम
BOI
Monday, June 03, 2019 | 05:15 PM
15 0 0
Share this article:

शिलॉंग : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून रोजी मेघालय राज्यात तब्बल १५ लाख झाडे लावण्याचा विक्रम केला जाणार आहे. एक नागरिक एक झाड या मोहिमेचा शुभारंभ त्या दिवशी होणार असून, राज्यात ३०६ ठिकाणी तब्बल दहा लाख झाडे लावण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने भारतीय वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.   

राज्यातील मृदा आणि जलसंवर्धन विभागातर्फे ही मोहीम हाती घेण्यात आली असून, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यासाठी निधी उपलब्ध केला आहे. मेघालयमधील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असून, यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक झाड देण्यात येणार आहे. दहा गावांचा एक ब्लॉक या प्रमाणे ४६ भागांमध्ये प्रत्येकी एक हजार झाडे लावण्यात येणार आहेत. याद्वारे चार लाख ६० हजार झाडांची लागवड होईल. यासाठी लागणारी रोपे स्थानिक पातळीवरील नर्सरीमध्ये तयार करण्यात आली आहेत. उमीऊ आणि गनोल क्षेत्रात हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 

शिलॉंग-तुरा आदी राष्ट्रीय महामार्गांच्या बाजूलाही वेगवेगळे वृक्ष लावण्याचे नियोजन आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शंभर शाळांना सहभागी करण्याचेही उद्दिष्ट आहे. या सामूहिक वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी समाजमाध्यमांद्वारे नावनोंदणी करण्यात येत आहे. सहभागी नागरिकांना झाडे लावण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य देण्यात येणार आहे. तसेच किमान दोन वर्षे हे झाड जगवले, तर विशेष सवलतही देण्यात येणार आहे. 

हैदराबादमध्ये पाच किलोमीटरची दौड 
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हैदराबादमध्ये पाच किलोमीटर अंतराच्या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. उमर अलिशा ग्रामीण विकास ट्रस्ट आणि श्री विश्व विजनना अध्यात्मिक पिठाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीठापुरम भागात नेकलेस रोडवर सकाळी सात ते नऊ या वेळेत ही फेरी होईल. यात सहभागी होण्यासाठी शंभर रुपये शुल्क आहे,’ अशी माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली.

हेही जरूर वाचा :

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 60 Days ago
Aim at what is practicable .
0
0

Select Language
Share Link
 
Search