Next
विश्वशांती यज्ञाद्वारे वैष्णवांचे विठ्ठलाला साकडे
प्रेस रिलीज
Monday, July 09 | 11:28 AM
15 0 0
Share this story



पुणे : सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदुंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या हजारो वैष्णवांनी ‘बा विठ्ठला... बळीराजाचे अकाली मरण टळू दे... सर्वसामान्यांना आता महागाईतून मुक्ती दे... जगामध्ये समाजातील सर्वधर्मसमभावाचा एकोपा कायम राहू दे’ अशी आळवणी केली. पुणे मुक्कामी असताना विश्वशांती यज्ञाद्वारे विठ्ठलाला असे साकडे घालण्यात आले.

माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे दरवर्षी विश्वशांती यज्ञाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचे हे यज्ञाचे २१ वे वर्ष होते. सहकारनगर येथील प्रसिद्ध श्रीलक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात वारकऱ्यांची निवास-भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी दरवर्षीप्रमाणे हजारो वारकऱ्यांनी  विश्वशांती यज्ञ करून वर्षानुवर्षे पायी वारी करणाऱ्या बळीराजाला निसर्गाचा प्रकोप, सरकारी अनास्था या दुष्ट चक्रातून सोडविण्यासाठी, समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट होऊन जगात शांतता नांदण्यासाठी विठ्ठलाला साकडे घातले.

वारकऱ्यांच्या पायांना तेल  लावताना आबा बागुल, अमित बागुल आदी.या प्रसंगी माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, सागर बागुल, रमेश भंडारी, हेमंत बागुल, नंदकुमार कोंढाळकर, अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी, सागर आरोळे, किरण कांबळे, अल्ताफ सौदागर धनंजय कांबळे, अशोक शिंदे, संतोष पवार यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी शिबिराचाही लाभ घेतला. त्यांना मोफत औषधे वितरित करण्यात आली. नित्यनेमाने यंदाही पंढरीच्या वाटेवर जाणाऱ्या या वैष्णवांच्या पायाची काळजी घेण्यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल, अमित बागुल आणि सहकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या पायाला तेलाने मालिश करून त्यांची सेवा केली.

(या उपक्रमाचा मुस्लिम बांधवांनी केलेल्या सेवेचा व्हिडिओ सोबत देत आहोत)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link