Next
‘ऑन्को लाइफ’ला ‘एनएबीएच’ची मान्यता
प्रेस रिलीज
Saturday, November 17, 2018 | 10:42 AM
15 0 0
Share this article:सातारा : शेंद्रे येथील ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर या सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलला ‘हॉस्पिटल आणि हेल्थकेअर प्रदात्यांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ’ (एनएबीएच) या संस्थेची मान्यता मिळाली असून, हे जिल्ह्यातील पहिले ‘एनएबीएच’ मान्यताप्राप्त सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय ठरले आहे.

रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवांमध्ये प्रवेश मिळवून देणे, तसेच सर्व प्रकारच्या सरकारी, निमसरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली. रुग्णालयातर्फे दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, सेवा, उपचार या सर्व बाबी लक्षात घेऊनच अशा प्रकारची मान्यता ‘एनएबीएच’कडून दिली जाते.

आरोग्य सेवा संस्थांनी ठरवून दिलेल्या नियमांचे अचूकपणे पालन करणे आणि त्यामध्ये सातत्याने सुधारणा करत राहणे अशी ‘एनएबीएच’ची मूल्यांकन प्रक्रिया आहे. या मान्यतेचा रुग्णांना योग्य आणि उत्तम आरोग्य सेवा, सातत्याने गुणवत्ता सुधारणा, रुग्ण साक्षरता अभियानाचा प्रसार करून त्याद्वारे विविध आजारांविषयी जनजागृती निर्माण करणे या प्रकारचा फायदा होतो. त्याचप्रमाणे ‘एनएबीएच’द्वारा प्रमाणित केलेल्या आरोग्य सेवा संस्थांकडून रुग्णांना विविध प्रकारचे फायदे मिळू शकतात. या मूल्यांकनाचे सर्वात मोठे लाभार्थी हे रुग्णच असल्याने या प्रमाणपत्रामुळे ‘ऑन्को’ सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हा लाभ मिळणार आहे.

‘ऑन्को’चे चेअरमन उदय देशमुख यांचा दूरदर्शी दृष्टीकोन आणि आरोग्य क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक व १० देशांपेक्षा अधिक ठिकाणी रेडिएशन तंत्रज्ञानाचा सेटअप उभारण्याचा पाठीशी असलेला अनुभव हीच ‘ऑन्को’ला ‘एनएबीएच’ची मान्यता मिळण्यामागची प्रेरणा आहे.

याबाबत बोलताना देशमुख म्हणाले, ‘ऑन्को लाइफ हे सातारा जिल्ह्यातील एकमेव सुपरस्पेशॅलिटी व सर्व सुविधांनीयुक्त कॅन्सर हॉस्पिटल असून, आता ते ‘एनएबीएच’ मान्यताप्राप्त हॉस्पिटल झाले आहे. येणाऱ्या काळात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, पुणे, मुंबई, मराठवाडा अशा सर्वच विभागातील रुग्णांना याचा लाभ निश्चितपणे होणार आहे, याचे समाधान आहे. या मानांकनासाठी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, सहकारी, तसेच पँरामेडिकल स्टाफ यांचाही तितकाच वाटा आहे. रुग्णहितासाठी ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर नेहमीच कटीबद्ध असेल.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सचिन About 248 Days ago
👌
1
0
Madhav vidwans About 249 Days ago
चांगली बातमी साताऱ्यात असेही घडते
0
0

Select Language
Share Link
 
Search