Next
‘टर्टलमिंट’चे १० हजारांहून अधिक भागीदार
प्रेस रिलीज
Tuesday, August 07, 2018 | 12:54 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील पहिला ऑनलाइन-ऑफलाइन पर्सनलाईज्ड प्लॅटफॉर्म असलेल्या ‘टर्टलमिंट’ने आपल्या डिजिटल पार्टनर कार्यक्रमांतर्गत भारतभरातील ७०० शहरांमध्ये आतापर्यंत १० हजारांहून अधिक पॉइंट ऑफ सेल पर्सन्सची (पीओएसपी) नोंदणी केली आहे. या कंपनीने २०१७मध्ये विमा एजंटसाठी ‘मिंटप्रो’ हे अॅप उपलब्ध केले. पुढील सहा महिन्यांत ५० हजार नोंदणीकृत भागीदारांचा आकडा पार होईल.

‘पीओएसपी’ ही अशी व्यक्ती की जी किमान १०वी इयत्ता उत्तीर्ण आणि त्या व्यक्तिला मोटार, आरोग्य, जीवन, प्रवास आणि अन्य श्रेणीतील प्री-अंडररिटन विमा उत्पादनांची विक्री करण्यासंदर्भातील प्रशिक्षण घेऊन परीक्षा द्यावी लागते. मोठ्या संख्येने असलेल्या योजनांची तातडीने तुलनात्मक माहिती उपलब्ध करणे, वैयक्तिक शिफारशी आणि ऑनलाइन देयके यांसारख्या उत्तम सेवा ग्राहकांना प्रदान करण्याच्या दृष्टीने टर्टलमिंटचा डिजिटल पार्टनर कार्यक्रम विमा एजंटला विविध वैशिष्ट्ये असलेल्या मिन्टप्रो अॅपसह सज्ज करतो.

‘टर्टलमिंट’चे सहसंस्थापक धीरेंद्र माह्यावंशी म्हणाले, ‘ऑनलाइन असलेले बहुतांश ग्राहक विमा उत्पादनांचा ऑनलाइन शोध घेतात, पण खरेदी मात्र ऑफलाइन करतात. अशा ग्राहकांना सेवा देणे सुलभ व्हावे यादृष्टीने ‘पीओएसपी’ हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. येत्या काही महिन्यांत आणखी अनेक शहरांमध्ये याचा विस्तार करण्याची आमची योजना आहे.’

‘ज्या ग्राहकांना विमा उत्पादनाच्या खरेदीसाठी वैयक्तिक स्तरावर मदत पाहिजे असते आणि दावाची प्रक्रिया करताना मदतीची गरज असते, अशा ग्राहकांना आमचे ‘पीओएसपी’ शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा देतात,’ असे माह्यावंशी यांनी सांगितले.

स्वत:च्या अल्गोरिदम आणि डाटा विश्लेषणाच्या आधारे ही कंपनी ग्राहकांना शिफारस करते; तसेच ही भारतातील पहिली कंपनी आहे की, या कंपनीचा १०० टक्के क्लेम सपोर्ट करता येईल अशा विम्याच्या विक्रीसाठी फेसबुकवर ‘इन्शुरन्स चॅटबोट’ आहे.

एजंट आपल्या स्मार्टफोनवर ‘मिंटप्रो’ हे मोबाइल अॅप्लिकेशन नि:शुल्क डाउनलोड करू शकतात. ज्याद्वारे आपापल्या परिसरातील लोकांपर्यंत या एजंटना पोहोचता येते आणि ग्राहकांकडून कमीत कमी माहिती घेऊन त्यांना आवश्यकतेनुसार त्वरित विमा देता येऊ शकतो. ग्राहकांचे बदलते स्वरूप तसेच इंटरनेटचा होत असलेला अधिकाधिक वापर ध्यानी घेता डिजिटल पेमेंटची सुविधा असलेल्या विमा उद्योगालाही यामुळे चालना मिळाली असून, ‘पीओएसपी’ एजंटच्या मोबाइल अॅप्लिकेशनद्वारेही ऑनलाइन पेमेंटचा लाभ घेता येऊ शकतो. देशात विमाधारकांची संख्या वाढविण्यासाठी जे शेवटच्या घटकापर्यंत पोहचू शकतील, अशा वितरकांची या उद्योगाला गरज आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link