Next
‘डॉक्सअॅप’द्वारे आता डॉक्टरांशी संपर्क साधणे सोपे
प्रेस रिलीज
Monday, October 22 | 01:13 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘डॉक्सअॅप’ या अग्रगण्य ऑनलाइन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या अॅपद्वारे डॉक्टरांशी संपर्क साधणे सोपे झाले आहे. या अॅपने आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त कंसल्ट पूर्ण केले आहेत. हृदयरोग, मानसरोग, त्वचारोग, जनरल मेडिसिन, वजन संतुलन आदी वेगवेगळ्या १९ वैद्यकीय शाखांमध्ये मिळून देशभरातील सुमारे तीन हजार रुग्ण दररोज याचा लाभ घेत आहेत.  

तंत्रज्ञान आणि डॉक्टरांची उपलब्धता या दोन्हीची सांगड घातल्यामुळे ‘डॉक्सअॅप’ हे ८० टक्के रुग्णांचा केवळ आठ मिनिटांमध्ये डॉक्टरांशी थेट संपर्क घडवून आणते. हे अॅप  केवळ त्वरित आणि सोईस्करच नाही, तर याद्वारे होणारे डॉक्टर व रुग्ण यांचे संभाषण सुरक्षित आणि १०० टक्के खासगी आहे. ‘डॉक्सअॅप’चा वापर करणाऱ्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण हे लहान शहरांमधील आहेत, ज्यांना पूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी मोठ्या शहरात जावे लागत होते. ‘डॉक्सअॅप’मध्ये वेगवेगळ्या भाषेतील तीन हजार डॉक्टर्स आहेत. यामुळे भाषेतील अडथळा दूर होतो. हे अॅप इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे.

या अॅपबद्दल बोलताना ‘डॉक्सअॅप’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहसंस्थपाक, सतीश कनन म्हणाले, ‘पूर्वी भारतातील लहान शहरातील जनतेला डॉक्टरांशी संपर्क साधण्यासाठी प्रवास करणे, क्लिनिकमध्ये वाट पाहणे, या सर्वांमुळे जवळपास आठ ते १० तास म्हणजेच जवळपास ६०० मिनिटे लागत होती; परंतु हा वेळ आता ७५ पटीने कमी होऊन केवळ आठ मिनिटांवर पोहचला आहे आणि तेही घरबसल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे शक्य झाले आहे.’

‘तंत्रज्ञान आणि वैद्यकीय ज्ञान यांचा सुयोग्य संगम साधल्यामुळे भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन वैद्यकीय सेवा त्वरीत पुरवणे शक्य झाले आहे. सुरुवातीला केवळ २५ कंसल्टेशन्सपासून ते आता १० लाख कंसल्टेशन्सपर्यंत  याची व्यापकता पोहचली आहे. हे यश संपादन करण्यात  तंत्रज्ञान आणि जनतेकडून होणारा इंटरनेटचा व्यापक प्रमाणावर वापर यांचा महत्त्वाचा हातभार आहे. याप्रकारे भविष्यात अधिकाधिक जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ‘डॉक्सअॅप’ करत आहे,’ असे कानन यांनी सांगितले.

ऑनलाइन वैद्यकीय सेवा पुरवण्यामध्ये ‘डॉक्सअॅप’ अग्रगण्य आहे आणि याचे गुणप्रामाण्य जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ठरवून दिलेल्या मापदंडाला अनुसरून आहेत. हे मापदंड म्हणजेच ‘रास्त दर’, ‘उपलभद्धता’ आणि ‘सहज वापरता येण्याजोगे’ असे आहेत.  एवढेच नाही, तर आयएसओ प्रमाणित असणारे हे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे एकमेव अॅप आहे. २०१८च्या अखेरपर्यंत दररोज १० हजार रुग्णांना सेवा पुरवण्याचा मानस आहे; तसेच वर्ष २०२०च्या शेवटपर्यंत ५० लाख रुग्णांना सेवा पुरवण्याचा मानस आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link