Next
शॉपमॅटिकतर्फे उद्योजकता उपक्रम
प्रेस रिलीज
Thursday, May 03 | 04:45 PM
15 0 0
Share this story

मुंबई : शॉपमॅटिक या आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनीने भारतातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रोत्साहक उद्योजकता उपक्रम’ सुरू केला आहे. याद्वारे दरमहा केवळ एक अमेरिकन डॉलरमध्ये विक्रेत्यांना आपले ऑनलाईन दालन उभारण्यासाठी या ब्रँडच्या आधुनिक तंत्रज्ञानात्मक टूल्सचा लाभ घेता येणार आहे. याच्या साह्याने विक्रेत्यांना आपल्या मालाचे व्यवस्थापन करण्यात, ऑर्डर्स मिळवण्यात; तसेच ग्राहकांकडून पेमेंट्स मिळवण्यातही मदत होणार आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना शॉपमॅटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक अनुराग अऊला म्हणाले, ‘अफाट कल्पनाशक्ती असलेले अनेक उदयोन्मुख उद्योजक भारताच्या कानाकोपऱ्यात दडलेले असून, आपली उत्पादने ऑनलाईन विकण्याची त्यांच्याही इच्छा आहे. त्यांना ऑनलाईन ई-कॉमर्सच्या प्रवासात येणाऱ्या सर्व अडचणी आम्ही दूर केल्या आहेत. त्यांना  यशस्वी ऑनलाईन व्यापार सुरू करून, तो चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स आम्ही शॉपमॅटिक प्रो सबस्क्रीब्शनच्या माध्यमातून पुरवत आहोत. यात स्टोअर क्रिएशन, डेटा अनालिटिक्स, लॉजिस्टीक्स, पेमेंट गेटवे या सुविधा उपलब्ध आहेत. केवळ एक डॉलर प्रति महिना इतकी नगण्य गुंतवणूक करून, व्यवसाय करण्याची इच्छा बाळगणारी भारतातील कुणीही व्यक्ती या सेवांचा लाभ घेऊ शकते. याद्वारे गृहिणी, एसएमई, विद्यार्थी, बेकर्स, कलाकार, छायाचित्रकार, सेवा पुरवठादार, डिझायनर्स, कारागीर यांच्यातून व्यापक प्रमाणात नवीन उद्योजक तयार होतील, अशी आम्हाला आशा आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link