Next
‘जलक्षेत्रातील अनागोंदी आणि हवामानातील बदल घातक’
प्रेस रिलीज
Monday, October 22, 2018 | 04:14 PM
15 0 0
Share this article:

वनराई संस्थेतर्फे आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ जलतज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरेपुणे : ‘पाणी चोरी, पाणी नाश, कालव्यांची दुरावस्था,  व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष ही कालव्यांची परिस्थिती बिघडण्याची प्रमुख करणे आहेत. कायद्याची अंमलबजावणी,  शिस्त आणि दरारा नसल्यामुळे कालव्यांची अवस्था खराब झाली आहे. जलक्षेत्रातील अनागोंदी आणि हवामानातील बदल यांची आघाडी ही राज्याला आगामी काळात घातक ठरणार आहे,’ असे मत जेष्ठ जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्त केले.

वनराई संस्थेतर्फे ‘महाराष्ट्रातील कालव्यांची सद्यस्थिती आणि त्यांचे भवितव्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. वनराई व्याख्यानमालेतील हे दुसरे व्याख्यान होते. या वेळी ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया उपस्थित होते.

प्रा. पुरंदरे म्हणाले, ‘आपल्याला कालव्यांच्या अपेक्षा एकविसाव्या शतकातल्या आहेत; मात्र आपली व्यवस्था एकोणिसाव्या शतकातील आहेत. जलव्यवस्थापनातील धोरणात्मक बदल होणे गरजेचे आहे. पाटबंधारे महामंडळाचे रूपांतरण हे नदीखोरे अधिकरणात केले गेले पाहिजे. पाटबंधारे विभाग म्हणजे केवळ भ्रष्ट्राचार, दुर्लक्ष नाही, अनागोंदी नाही, तर ही एक जाणूनबुजून केलेली धोरणात्मक रचना आहे. खासगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण या धोरणाचा हा एक भाग, तर नाही ना असे वाटायला लागले आहे.’

वॉटर मार्केट म्हणजेच जलबाजार आणि शेतीचे कंपनीकरण करण्यासाठी जी साफसफाई करावी लागते ती चालली आहे की काय, ही भीती प्रा. पुरंदरे यांनी व्यक्त केली.

‘वनराई’तर्फे ‘एक महिना- एक व्याख्यान’ यानुसार प्रत्येक महिन्यामध्ये विशिष्ट विषयावर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञाचे व्याख्यान आयोजित केले जाते. शेती, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांशी निगडीत निरनिराळ्या समस्या, त्यावरील उपाययोजना, तसेच या क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या घडामोडीशी संबंधित विषय या व्याख्यानमालेच्या केंद्रस्थानी असतात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनराई मासिकचे संपादक अमित वाडेकर यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search