Next
‘सनवर्ल्ड’तर्फे ज्येष्ठांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
BOI
Wednesday, March 06, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या ‘सनवर्ल्ड फॉर सीनिअर्स’ या संस्थेच्या वतीने समृद्ध जीवन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात साठीनंतरचे जीवन समृद्ध करण्यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. पुण्याजवळ खानापूर येथील ‘सनवर्ल्ड फॉर सीनिअर्स’च्या वृद्धाश्रमात २३ व २४ मार्च २०१९ रोजी हे प्रशिक्षण होणार आहे.

संस्थेतर्फे या आधी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात दोन बॅचचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. ही प्रशिक्षणाची तिसरी बॅच आहे. ‘सनवर्ल्ड’च्या संस्थापिका व वृद्धकल्याणशास्त्र तज्ज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन, डॉ. मंगला जोगळेकर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यशाळेत ज्येष्ठांशी संबंधित १० विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. समृद्ध जीवनाची संकल्पना, जेष्ठ कल्याणशास्त्र म्हणजे काय, ज्येष्ठांची अवहेलना, काळजी घेणाऱ्याची काळजी, वैद्यकीय इच्छापत्र, मन:शांतीसाठी योग, उत्तर आयुष्याचे व्यवस्थापन, आपल्यासाठी आपणच, मोबाइल आपला मित्र– तंत्रज्ञानाशी मैत्री, आर्थिक नियोजन या विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. हे प्रशिक्षण केवळ व्याख्यानांवर आधारित नसून, सोलो वॉक, रोल प्ले टेक्निक, कलोपचार, सहभाग व सहअनुभूती या कार्यप्रवण करणाऱ्या अक्टिव्हिटींच्या माध्यमांतूनही विषय मांडले जाणार आहेत.

सहभागी होण्यासाठी संपर्क : अमोल- ९४३४५ ३८४७७
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search