Next
नाणी, नोटा बदलण्यासाठी ‘आयसीआयसीआय’चे मेळावे
प्रेस रिलीज
Friday, October 26, 2018 | 04:41 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आयसीआयसीआय बँकेने महाराष्ट्रातील निवडक शाखांमध्ये नुकतेच ४०० हून अधिक कॉइन एक्स्चेंज मेळाव्यांचे आयोजन केले होते. हे मेळावे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पाठबळाने घेण्यात आले. खराब झालेल्या व मळलेल्या नोटांच्या बदल्यात लोकांना नवी नाणी व नोटा यात बदलून देण्यात आल्या.

बँकेने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर व बारामती यांसह ८०हून अधिक शहरांतील आपल्या शाखांमध्ये हे मेळावे घेतले. ‘पॉवर ऑफ वन’ या देशव्यापी उपक्रमाचा हा भाग असून, त्याअंतर्गत बँकेच्या देशभरातील विविध शाखांनी एकाच दिवशी कॉइन एक्स्चेंज मेळावे आयोजित केले होते.

‘आरबीआय’चे इश्यू विभागाचे जनरल मॅनेजर सतीश चंदर व ‘आरबीआय’चे असिस्टंट जनरल मॅनेजर ए. बी. पी. पांडे यांच्या हस्ते मुंबईतील बँकेच्या फोर्ट शाखेत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यांमध्ये सुमारे पाच हजार ग्राहकांचा सहभाग होता व त्यांनी १० रुपये, पाच रुपये, दोन रुपये व एक रुपया या मूल्याची नाणी व १० रुपये, २० रुपये, ५० रुपये मूल्याच्या नोटा मिळून तीन कोटी रुपयांची नाणी व नव्या नोटा बदलून घेतल्या. छोट्या रकमांचे व्यवहार सुलभपणे करता यावेत, यासाठी कमी मूल्याची नाणी व नोटा घेण्यासाठी या मेळाव्यांमध्ये व्यापारी, रिटेलर व निवृत्त व्यक्ती अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी सहभाग घेतला.

आयसीआयसीआय बँकेने एकाच दिवशी देशभर दोन हजार ५३६ कॉइन एक्स्चेंज मेळावे घेतले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, यात सुमारे ३६ हजार ग्राहक सहभागी झाले होते. त्यांनी ४० कोटी रुपयांची नाणी व नव्या नोटा बदलून घेतल्या. स्वीकारार्ह मळक्या व खराब नोटा घेऊन लोकांना नवी नाणी व नोटा देण्यासाठी बँक विशिष्ट कालावधीने कॉइन एक्स्चेंज मेळावे घेते. नाणी व नोटा बदलण्याच्या या सेवेचा लाभ कोणालाही मोफत घेता येऊ शकतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link