Next
डॉ. राजेंद्रसिंह यांना ‘महापालक राष्ट्रीय सन्मान’ जाहीर
प्रेस रिलीज
Friday, July 20, 2018 | 04:42 PM
15 0 0
Share this story

मीना सिंह आणि डॉ. राजेंद्रसिंह राणा
पुणे : डीपर, सर फाउंडेशन व ‘तुम्ही-आम्ही पालक’ यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय पालकदिनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘महापालक राष्ट्रीय सन्मान’ पुरस्कार यंदा जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा आणि मीनासिंहजी यांना, तर ‘संस्थापालक सन्मान’ पुरस्कार वरोरा येथील ज्ञानदा जीवन विकास केंद्राचे संस्थापक प्रा. मधुकर उपलेंचवार यांना जाहीर झाला आहे. 

‘कोथरूड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन येथे २१ आणि २२ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हे सन्मान प्रदान केले जाणार आहेत’, अशी माहिती डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची फाउंडेशनचे संस्थापक हरीश बुटले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. मधुकर उपलेंचवार
बुटले पुढे म्हणाले, ‘एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सौभाग्यलंकार असे महापालक सन्मानाचे, तर ५१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व मानपत्र असे संस्थापालक सन्मानाचे स्वरुप आहे. संस्थेच्या वतीने आयोजित दोन दिवसांच्या या कार्यक्रमात २१ जुलै रोजी संस्थापालक सन्मान व २२ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय पालकदिनी महापालक राष्ट्रीय सन्मान प्रदान केला जाणार आहे. महापालक सन्मान सोहळ्यासाठी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून, तर लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक कुकडे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. संस्थापालक सन्मान सोहळ्यासाठी सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. चारुदत्त आपटे प्रमुख अतिथी म्हणून, तर माजी आमदार उल्हासदादा पवार अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. याशिवाय, वैद्यकीय व इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या डीपरच्या विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त शिक्षक-कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. रवींद्र कोल्हे, दिलीप अरळीकर, डॉ. राजाभाऊ दांडेकर उपस्थित राहणार आहेत.’ 

‘या वेळी ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या सहाव्या वर्षाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन, तसेच खेड्यांचे सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेल्या ‘साद ग्राम’ या अॅ पचे अनावरण होईल. दोन्ही दिवशी विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. यामध्ये माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, कुडाळ येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, ‘जडण-घडण’चे संपादक डॉ. सागर देशपांडे, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर सहभागी होणार आहेत. उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. शुभांगी आणि डॉ. विनय कोपरकर या दांपत्याशी ‘सहसंवाद : कृतार्थ सहजीवनाचा’ विषयावर गप्पा रंगणार आहेत. संध्याकाळी जुन्या हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. दुसर्यास दिवशी मार्गदर्शन व कार्यकर्ता संवाद होणार असून, त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते ईश्वरलाल परमार, दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन, रूरल रिलेशनचे प्रदीप लोखंडे व सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर सहभाग घेतील. ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी संस्थांचे योगदान’ या सामाजिक विषयावरील परिसंवादात आदर्शग्रामचे अध्यक्ष पोपटराव पवार, मध्यप्रदेशातील नर्मदालयाच्या भारती ठाकूर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उदय वारुंजीकर, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी सहभागी होणार आहेत. त्यानंतर कार्यकर्ता प्रशिक्षण होणार आहे’, असेही हरीश बुटले यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link