Next
रोपळेतील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
BOI
Monday, March 18, 2019 | 03:38 PM
15 0 0
Share this article:सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांना गावकऱ्यांनी दाद दिली.

येथील प्राथमिक शाळेची शैक्षणिक गुणवत्ता चांगली असल्याने पालकांचे आणि संपूर्ण गावाचे लक्ष आता शाळेच्या विकासावरच केंद्रीत झाले आहे. याचाच भाग म्हणून प्रशालेत नुकत्याच झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला पालकांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त साथ दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, सरपंच दिनकर कदम, शिवानी मशिनरीचे संचालक बाळासाहेब शेंडे, अविनाश कदम आदींनी रोख स्वरूपात बक्षीसे दिले.  

या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्य माने यांच्या हस्ते झाले. या वेळी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले, विलास (ल.) भोसले, निवृत्त कृषी पर्यपेक्षक मधुकर गुंजाळ, केंद्रप्रमुख डॉ. एन. टी. भोसले, जनसेवा संघटनेचे अशोक पाटोळे, रोपळे विकास प्रतिष्ठानचे अर्जुन भोसले, सतीश भोसले, दत्तात्रय कदम, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारीका भोसले, मुख्याध्यापक सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

संमेलनात विद्यार्थांनी सादर केलेल्या बहारदार कलाविष्कारामुळे कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत रंगत गेला. या कार्यक्रमाला रोपळेसह मेंढापूर, आष्टी, येवती, आढीव, बाभूळगाव, खरातवाडी व पांढरेवाडीतील शिक्षण प्रेमी व पालक आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्मिनी व्यवहारे, अरुण माळी, शशी कांबळे, तानाजी ढेकळे, प्रमोद लोणारकर, अजिनाथ पवार, समाधान आयरे, वैषाली जगताप, वर्षाराणी गोडसे, छाया समलखांब, कल्पना माने यांनी प्रयत्न केले.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Tanaji Dhekale About 155 Days ago
खुपच छान
0
0
Arun Mali About 156 Days ago
Prerna milali..... Khup Chhan..
1
0

Select Language
Share Link
 
Search