Next
शिवतेज क्रिकेट क्लबतर्फे आयोजित स्पर्धेत एम. डी. आझाद संघ प्रथम
नागेश शिंदे
Monday, November 12, 2018 | 12:18 PM
15 0 0
Share this story

हिमायतनगर : शिवतेज क्रिकेट क्लब प्रस्तुत आमदार चषक २०१८ स्पर्धेचा अंतिम सामना ११ नोव्हेंबर २०१८ रोजी हिमायतनगरमध्ये झाला. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एम. डी. आझाद संघाने, तर द्वितीय पारितोषिक साई इलेव्हन, नांदेड संघाने पटकावले. शिवतेज क्रिकेट क्लब, हिमायतनगर या संघाला तृतीय क्रमांक मिळाला. क्रिकेटप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंतिम क्रिकेट सामन्याचा आनंद घेतला. हदगाव-हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनीही हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. 

आमदार नागेश पाटील-आष्टीकर, हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपनगराध्यक्ष मो. जावेद, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, संदीप अग्रवाल यांच्यातर्फे बक्षिसे देण्यात आली. नगरसेवक रामभाऊ ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शकरगे, संदीप अग्रवाल, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, आदेश सेठ श्रीश्रीमाळ, विनोद आरेपल्लू, विलास वानखेडे, प्रकाश रामदीनवार, राम नरवाडे, सुनील चव्हाण, योगेश चिल्कावार, रजाक भाई, सलीमभैया शेवाळकर, दीपक कात्रे, मंगेश धुमाळे, गजानन चायल, विपुल दंडेवाड, गोविंद शिंदे, बाळू कंठाळे, शिवतेज क्रिकेट क्लबचे अध्यक्ष शुभम संगनवार, शुभम दंडेवाड, सोनू चिठ्ठेवाड, विशाल काळे, विष्णू वानखेडे, विशाल बडेराव, विशाल मेंडके, नागेश शिंदे यांच्यासह शिवतेज मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण सोहळा झाला. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link