Next
दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; ऑनलाइन निकाल आठ जूनला
BOI
Sunday, June 09, 2019 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आठ जून २०१९ रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी एक वाजल्यानंतर mahresult.nic.in या वेबसाइटवर हा निकाल उपलब्ध होणार आहे. मंडळाकडून याबाबतची अधिकृत घोषणा सात जून रोजी करण्यात आली. याबद्दल बरेच उलटसुलट मेसेज फिरत असल्याने संभ्रम निर्माण झाला होता; मात्र आता प्रतीक्षा संपली आहे.

मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन त्यात राज्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल वेबसाइटवर पाहता येईल, असे कळवण्यात आले आहे. प्रत्यक्ष गुणपत्रिका कधी मिळतील, याचे वेळापत्रक मात्र अद्याप मंडळाने जाहीर केलेले नाही. 

mahresult.nic.in या वेबसाइटबरोबरच examresults.net, indiaresults.com, results.gov.in, www.maharashtraeducation.com, www.sscresult.mkcl.org या वेबसाइटवरही निकाल उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉल तिकीट/बैठक क्रमांकाच्या आधारे आपला निकाल शोधता येईल.

बीएसएनएल मोबाइल ग्राहकांना एसएमएसद्वारेही निकाल उपलब्ध होणार आहे. त्यासाठी MHSSC<Space>Seat No. या पद्धतीचा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search