Next
चित्रपदार्पण पुरस्कारांमध्ये ‘रेडू’ची बाजी
सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शनासह पाच पुरस्कार
BOI
Monday, March 04, 2019 | 03:14 PM
15 0 0
Share this story

डिव्हाईन कॉज सोशल फाउंडेशन आणि मराठी चित्रपट परिवारतर्फे आयोजित नवव्या चित्रपदार्पण पुरस्कारांमध्ये विविध विभागातील नवोदितांना सन्मानित करण्यात आले.

पुणे : नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या डिव्हाईन कॉज सोशल फाउंडेशन आणि मराठी चित्रपट परिवारतर्फे आयोजित नवव्या चित्रपदार्पण पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासह दिग्दर्शक, कथा अशा विविध विभागांमध्ये पुरस्कार पटकावून ‘रेडू’ या चित्रपटाने बाजी मारली. 

प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, पुष्कर जोग, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, निर्माते वैभव जोशी, अभिनेता राहुल सोलापूरकर, प्रिती व्हिक्टर, सुनंदा काळुसकर मराठी चित्रपट परिवारचे निवृत्ती जाधव, राहुल सूर्यवंशी या वेळी उपस्थित होते. 

‘रेडू’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक सागर वंजारी यांना गौरविण्यात आले. ‘मंत्र’ चित्रपटासाठी सौरभ गोगटे आणि ‘शिकारी’ चित्रपटासाठी सुव्रत जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले, तर तृप्ती तोरडमल यांना ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटासाठी आणि गौरी किरण यांना ‘पुष्पक विमान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ‘हॉस्टेल डेज’मधील भूमिकेसाठी विराजस कुलकर्णी आणि ‘मंत्र’मधील भूमिकेसाठी शुभंकर एकबोटे यांना मिळाला. 

‘माधुरी’ चित्रपटातील भूमिकेसाठी संहिता जोशी हिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविला. संजय नवगिरे यांची ‘रेडू’ची कथा सर्वोत्कृष्ट ठरली तर ‘फर्जंद’ चित्रपटाच्या पटकथा आणि संवादासाठी दिग्पाल लांजेकर यांना पारितोषिक मिळाले. बबन चित्रपटाचे गीतकार सुहास मुंढे सर्वोत्कृष्ट गीतकार ठरले, तर याच चित्रपटासाठी ओंकार स्वरुप यांना गौरविण्यात आले. 

नॉन फिल्मी म्युझिक अल्बम विभागामध्ये ‘यु अॅंड मी’ अल्बम सर्वोत्कृष्ट ठरला. अमिता घुगरी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, रणजीत माने सर्वोत्कृष्ट कॅमेरामन, नेहा गुप्ता सर्वोत्कृष्ट निर्मितीमूल्य, सर्वोत्कृष्ट संकलन सचिन पंडीत, सर्वोत्कृष्ट वेशभूषा मोहिनी ननावरे, सर्वोत्कृष्ट संगीतकार साई पियुष, शशांक प्रतापवार साहिबा, सर्वोत्कृष्ट गायक सागर मोडक, सर्वोत्कृष्ट गायिका रसिका सुनील, सर्वोत्कृष्ट गीतकार अदिती द्रविड यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link