Next
‘टाइम्सप्रो’ आणि ‘जीएनआयएमएस’ एकत्र
प्रेस रिलीज
Tuesday, April 24 | 12:43 PM
15 0 0
Share this story

पुणे : बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस मधील पोस्ट ग्रॅज्युएट बिझनेस मॅनेजमेंट प्रोग्रामसाठी ‘टाईम्सप्रो’ने ‘एसजीपीसी’च्या गुरू नानक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजशी भागीदारी केली आहे. इतर व्यवस्थापन कार्यक्रमांच्या तुलनेत, ‘पीजीडीएम’चा ‘बीएफएसआय’ उद्योगात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एक विशेष फायदा देत आहे.

या वेळी टाईम्स प्रोफेशनल लर्निंगचे अध्यक्ष अनिश श्रीकृष्ण म्हणाले, ‘अभूतपूर्व वाढ आणि आव्हानांसाठी ‘बीएफएसआय’ सेक्टर सज्ज आहे. मला खात्री आहे, की या भागीदारीमुळे गतिमान व्यावसायिकांचा एक समूह तयार करण्यात मदत होईल, जे फायदे घेऊ शकेल आणि आव्हानांचा सामना करू शकेल.’

‘एआयसीटीई’ने मंजूर केलेला हा दोन वर्षांचा ‘पीजीडीएम’ (बँकिंग व वित्तीय सेवा) कार्यक्रम आहे, ज्यामध्ये ‘टाईम्सप्रो’ हे शैक्षणिक आणि रोजगार भागीदार आहे, तर ‘पीजीडीएम’ला ‘एसजीपीसी’च्या ‘जीएनआयएमएस’कडून प्रदान केले जाईल.

‘जीएनआयएमएस’चे संचालक डॉ. दत्ताजीराव पाटील म्हणाले, ‘आम्हाला ‘टाईम्सप्रो’सारख्या समृद्ध परंपरा असलेल्या एका अनुभवी व प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थेशी सहकार्य करण्यास अभिमान वाटतो आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्यातून सर्वोत्तम मार्गदर्शन मिळेल, अशी खात्री आहे.’
 
हे प्रोग्राम प्रगत ‘बीएफएसआय’ सॉफ्टवेअरमध्ये सॉफ्टवेअर-आधारित ज्ञानही वितरीत करते. विद्यार्थ्यांना ‘एनआयएसएम’ आणि ‘डीबीएफ’ प्रमाणपत्रांसाठी ही तयार केले जातात ज्यांना उद्योगामध्ये खूप मान्यता आहे. त्यामुळे पूर्वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना ‘डीबीएस’, ‘एचएसबीसी’, ‘एचडीएफसी’ बँक, अॅक्सिस बँक, स्टँडर्ड चार्टर्ड सिक्युरिटीज, टाटा कॅपिटल आणि येस बॅँक यांमध्ये सहजपणे नोकरी मिळाली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link