Next
‘सिद्धांत’च्या स्किल साथी कार्यक्रमाला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 11:29 AM
15 0 0
Share this storyसोलापूर : येथील सिद्धांत युनिव्हर्सल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्किल इंडियाच्या ‘स्किल साथी’ या कार्यक्रमामध्ये विविध शाळा व महाविद्यालयांतील सुमारे ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

या प्रसंगी स्किल इंडियाचे समन्वयक प्रा. गणेश चन्ना यांनी विद्यार्थ्यांना एनएसडीसी, पीकेएमव्हीव्हाय, पीएमकेके, डीडीयूजीकेव्हाय, स्किल इंडिया, उस्ताद (यूएसटीटीडी), समर्थ, एनएपीएस आणि वर्ल्ड स्किल अशा अनेक शैक्षणिक व रोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या मोफत कोर्सेस आणि प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, नवसंशोधनाची संस्कृती जोपासण्यासाठी तसेच आपली कौशल्ये विकसित करण्याविषयी मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.या समुपदेशन कार्यक्रमात सोलापुरातील कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सेवासदन कनिष्ठ महाविद्यालय, संभाजीराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय, छत्रपती शिवाजी नाइट कॉलेज आणि श्री. आंध्र भद्रावती माधायामिक प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link