Next
‘दिव्यांग विकास प्रतिष्ठानची स्थापना करणार’
सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री बडोलेंनी केली घोषणा
प्रेस रिलीज
Friday, June 14, 2019 | 02:24 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शारीरिक पुनर्वसन, प्रशिक्षण, संशोधन आणि सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास प्रतिष्ठान स्थापन करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली.

या बोलताना वेळी बडोले म्हणाले, ‘दिव्यांग विकास प्रतिष्ठानमार्फत दिव्यांग हक्क अधिनियम सन २०१६ व दिव्यांग सक्षमीकरण धोरण सन २०१८मधील तरतुदींचा लाभ दिव्यांग व्यक्तींस मिळवून देणे, दिव्यांग व्यक्तींसंबंधी विविध जनजागृती कार्यक्रम, दिव्यांग क्षेत्रासंबंधित संशोधन, दिव्यांग व्यक्तींमधील कौशल्यांचा विकास करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, दिव्यांगासंबंधित विविध साहित्याचे प्रकाशन, दिव्यांग व्यक्ती व संबंधित संस्थेमधील कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबिवले जाणार आहेत.’

‘त्याच प्रमाणे राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र व व्यवसाय पुनर्वसन केंद्र, दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना व संबंधित संस्थांना पुरस्कार देणे, दिव्यांग खेळाडूंसाठी दिव्यांग क्रीडा प्रबोधिनीची स्थापना, दिव्यांग साहित्य, कला व उद्योजकता संमेलन, दिव्यांगांसाठी विवाह मंडळाची स्थापना करून सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे, विशेष शाळा, प्रशिक्षण केंद्र, बालगृह, शीघ्र हस्तक्षेप केंद्र व इतर दिव्यांगांच्या उपक्रमाबाबत शासन आदेशानुसार कामकाज, दिव्यांग व्यक्तींसाठी विविध मार्गदर्शन शिबिरे, कायदेशीर सल्ला, समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र, दिव्यांग व्यक्तींना उपयोगी असे साहित्यांचे प्रकाशन करणे, दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी विविध योजना व उपक्रम राबविणे हे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाणार आहे,’ असे बडोले यांनी सांगितले. 

दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे कार्यालय महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, विभागीय कार्यालय, नागपूर हे राहणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search