Next
म्युच्युअल फंड जनजागृती अभ्यास मोहीम
प्रेस रिलीज
Wednesday, February 14 | 01:01 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘फाउंडेशन ऑफ इंडिपेंडंट फायनांशियल अॅडव्हायजर्स’ (एफआयएफए) आणि ‘फायनल माइल कन्सल्टिंग’ या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने, १३ फेब्रुवारी रोजी भारतीय म्युच्युअल फंड गुंतवणूकदार जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या अभ्यास मोहिमेअंतर्गत भारतीय गुंतवणूकदारांमधील म्युचुअल फंडाबद्दलचे गैरसमज दूर केले जाणार असून, म्युच्युअल फंडाच्या प्रसारासाठी अधिक प्रयत्न केले जातील.

या अभ्यासमोहिमेत भारतीय गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडाबद्दलची अनास्था कमी करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत. सर्वप्रथम जुन्या आणि नवीन गुंतवणूकदारांमध्ये जागृती निर्माण करण्यात येईल. दुसरी गोष्ट म्हणजे या गुंतवणूदारांना म्युच्युअल फंड मोहिमेशी जोडले जाईल. तसेच, म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीबद्दलच्या निर्णयांबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल.

‘फीफा’चे अध्यक्ष ध्रुव मेहता या अभ्यासमोहिमेच्या उद्घाटनानंतर म्हणाले, ‘फायनल माइल कन्सल्टिंग या संस्थेशी हातमिळवणी करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आम्ही सादर करीत असलेली ही अभ्यासमोहिम ही आपल्या देशातील पहिलीच मोहिम ठरणार आहे. भारतीय गुंतवणूकदार म्युच्युअल फंड क्षेत्राकडे कोणत्या नजरेनं पाहतो, याचा अंदाज आपल्याला या अभ्यासमोहिमेतून येणार आहे. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूकदार; जसे की केंद्रशासन, नियंत्रक, निर्माते, वितरक, गुंतवणूकदारांनाही पडलेल्या प्रश्नांची यातून उत्तरे मिळणार आहेत.’

या अभ्यासमोहिमेद्वारे भारतीय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची मानसिकता कळणार आहे. तसेच भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रातील चार विविध गुंतवणूकदारांची वेगवेगळी वैशिष्ट्येही समोर येणार आहेत. गुंतवणूकदारांची विभागणी ‘डिफीसीट फ्रेम इन्व्हेस्टर्स’, ‘सरप्लस इन्व्हेस्टर्स’, ‘मॉडरेटली डिफीसीट इन्व्हेस्टर्स’ आणि ‘मॉडरेटली सरप्लस इन्व्हेस्टर्स’ या चार गटांमध्ये करण्यात आली आहे.

या प्रत्येक विभागाची काही उद्दिष्टे आहेत. मात्र या सर्व विभागांना गुंतवणूकदारांना दीर्घकालीन म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे वळविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तसेच या अभ्यासमोहिमेद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक नसलेल्या व्यक्तीचे, चांगल्या म्युच्युअल फंड गुंतवणूकदारात परावर्तन होताना येणारे अडथळेही स्पष्ट होणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link