Next
म्हातारा आणि बैल
BOI
Saturday, May 05, 2018 | 10:14 AM
15 0 0
Share this story

ग्रामीण भावविश्वावर आधारलेली ही कादंबरी माणूस आणि प्राणी यांचे परस्परसंबंध उलगडते. सुहास दामोदर मनसुटे यांनी एका म्हाताऱ्या शेतकऱ्याची आणि त्याच्या बैलाची सांगितलेली ही कथा आहे. शेतकरी जगताची ही कथा आहे. शेतकरी जगताची ही प्रातिनिधिक कथा आहे. शेतकरी कुटुंबातील एका बैलाचा एक पाय अचानक लुळा पडतो.

बैलाला कसायला विकण्याची तयारी कुटुंबातील सदस्य करू लागतात; पण म्हाताऱ्याला ते मान्य नसते. तो तडजोड करायला तयार होत नाही. कुटुंबाच्या विरोधात उभा राहतो. विरोध दुबळा पडतो, तेव्हा लुळ्या पायाच्या बैलाला घेऊन घर सोडून निघून जातो. व्यावहारिकदृष्ट्या कुटुंबातील सदस्य चुकीचे नसतात; पण म्हातारा अधिक संवेदनशील असतो, मुक्या जनावरावरही मुलासारखे प्रेम करतो, त्याच्यासाठी संकटालाही सामोरे जातो. त्या दोघांतील प्रेमाचे बंध समजावून घेण्यास इतर लोक कमी पडतात. हे कथेतून दिसते.

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन
पाने : २०४
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ramdas baban kokare About 121 Days ago
Very nine
0
0

Select Language
Share Link