Next
‘विवो’तर्फे डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनिंग टेक्नोलॉजी भारतात सादर
प्रेस रिलीज
Wednesday, May 30, 2018 | 05:26 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ग्लोबल प्रिमियम स्मार्टफोन ब्रँड असलेल्या ‘विवो’तर्फे नवीन ‘विवो एक्स२१’ हा उद्योगातील पहिला डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनिंग टेक्नोलॉजी असलेला स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. हा फोन म्हणजे जागतिक तंत्रज्ञानामध्ये एक उल्लेखनीय झेप असून, यातील डिस्प्रटिव्ह अनलॉकींग तंत्रज्ञानासह हा फोन ग्राहकांसाठी अधिक सुरक्षित आहे.

‘विवो एक्स२१’ची किंमत ३५ हजार ९९० असून, हा काळ्या रंगांत उपलब्ध आहे. २९ मे २०१८पासून निवडक ऑफलाइन स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल, तसेच हा फोन फ्लिपकार्टडॉटकॉम व शॉपडॉटविवोडॉटकॉम/इन या ऑनलाइन स्टोअर्सवर विविध ऑफर्ससह उपलब्ध असेल.

विवो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केंट चेंग म्हणाले, ‘विवोने ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण संकल्पनांचा अवलंब केला आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता स्मार्टफोन बाजारपेठेत यश मिळविण्यासाठी अभिनवता निर्णायक ठरत आहे. या अभिनवतेच्या परिसीमा ओलांडत विवो हे यशस्वीरित्या इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनिंग टेक्नोलॉजीचे प्रवर्तक बनले आहे. ‘विवो एक्स२१’ हा अनोखे वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन भारतात सादर करताना आनंद होत आहे.’

‘विवो एक्स२१’मध्ये अद्ययावत इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनिंग टेक्नोलॉजी आहे. ज्यामुळे स्मार्टफोनचे स्लीक व युनिफाईड डिझाईन कायम राहते. ज्या क्षणी वापरकर्ते स्क्रीनला स्पर्श करतात त्या क्षणी ओएलइडी डिस्प्ले सक्रीय होतो व बोटावर प्रकाश पडतो. ओएलइडी डिस्प्लेच्या खाली असलेला ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर हा विशिष्ट फिंगरप्रिंट पॅटर्नवरून प्रतिबिंबित प्रकाश ओळखून काबीज करतो व हे सेन्सरद्वारे सत्यतेसाठी प्रक्रिया करते.

यात १५.९५ सेमी (६.२८) १९:९ एफएचडी+फुल व्ह्यू डिस्प्ले विथ १.६ मिली साईड बेझेल्स आहेत आणि अधिक चांगला पाहण्याचा अनुभव देण्यासाठी ९०.३ स्क्रीन टू बॉडी रेशो आहे. ‘विवो’मध्ये फन टच ओएस ४.० आहे. ज्यामुळे ऑप्टिमाइज्ड नोटिफिकेशन बार एक निरंतर अनुभवासाठी विकसित केला गेला आहे. उच्च दर्जाचा डिस्प्लेला पूरक म्हणून ‘विवो एक्स२१’मध्ये पी३ डिस्प्ले कलर मॅनेजमेंट तंत्रज्ञान जोडण्यात आले आहे व पी३ रंगछटांच्या साहाय्याने अचूक नैसर्गिक व संतृप्त रंगांचा अनुभव मिळतो.

ग्राहकांना फोटोग्राफीचा चांगला अनुभव देण्याचा ‘विवो’चा वारसा पुढे नेत ‘एक्स२१’मध्ये १२ एमपी फ्रंट व रेअर कॅमेराज आहेत, ज्यामध्ये ड्युएल पिक्सल सेन्सर्स आहेत. याशिवाय एक अतिरिक्त पाच एमपी रेअर कॅमेरा आहे. ‘विवो एक्स२१’मधील डयुएल पिक्सेल सेन्सर्स फक्त फोकस स्पीडस सुधारण्यामध्ये मदत करत नाहीत, तर अधिक पिक्सेल संख्येमुळे चित्रामधील स्पष्टता देखील वाढवितात. याशिवाय कमी प्रकाशाच्या ठिकाणी देखील अधिक उजळ व स्पष्ट चित्र देण्यात हे सक्षम आहेत.

‘विवो एक्स२१’मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० असून, यामुळे अद्यावत काळातील ग्राहकांच्या अनेक गरजा एकाच वेळी प्रभावीपणे हाताळते. यातील प्रोसेसरबरोबर ताकदवर सहा जीबी रॅम हे मोबाईल गेम्ससह अ‍ॅप्लिकेशनचा एकंदरच वेग वाढवते. १२८ जीबी स्टोअरेज स्पेसमुळे ग्राहक अनेक फोटोज घेऊ शकतात व त्यांचे आवडते संगीत, चित्रपट व अ‍ॅप्लिकेशन्स स्टोअरेज स्पेसच्या मर्यादांची चिंता न करता सेव्ह करू शकतात.

हा फोन ‘विवो’चा हायफाय वारसाचा विस्तार करत हायफाय ऑडिओ चीपसेटसह अधिक चांगला श्रवण अनुभव देतो. ‘एक्स२१’मधील डीप फिल्ड तंत्रज्ञानासह ग्राहकांना पॅनोरामिक सराउंड, मेगा बास, क्लिअर वॉइस इफेक्ट व एनव्हायरमेंटल ऑडिओ इफेक्टसचा अनुभव देण्यासाठी अनेक पर्याय आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link