Next
‘गोक्वेस्ट’द्वारे डिजिटल स्टुडिओज युनिटची स्थापना
प्रेस रिलीज
Friday, May 25, 2018 | 12:49 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : गोक्वेस्ट मिडीया व्हेंचर्स या जगभरात भारतीय साहित्याच्या सर्वांत मोठ्या स्वतंत्र वितरकाने अलीकडेच आपल्या नवीन कंटेंट निर्मिती विभाग गोक्वेस्ट डिजिटल स्टुडिओजच्या अनावरणाची घोषणा केली. या स्टुडिओमधून उत्साही आणि वेगाची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी उच्च दर्जाच्या, अनस्क्रिप्टेड प्रोग्रामिंगचा विकास आणि निर्मिती करून वितरण केले जाईल. या युनिटचे नेतृत्व ‘गोक्वेस्ट’च्या भारत, आग्नेय आशिया, मध्यपूर्व आणि आफ्रिकेतील डिजिटल स्टुडिओज ऑपरेशन्सचे संचालक दर्शन भट्ट यांच्याकडे असेल.

गोक्वेस्ट डिजिटल स्टुडिओजचे संचालक भट्ट म्हणाले, ‘भारतातील ब्रँडेड कंटेंट जाहिरात बाजारपेठ ही चांगल्या वेगाने वाढते आहे; परंतु तरीही ब्रँड्सना विविध प्राधान्यक्रम असलेल्या विविध एजन्सींसोबत जुळवून घेणे कठीण जाते. याबाबत ‘गोक्वेस्ट’चा फायदा होतो. कंटेंटवर आधारित ब्रँडिंगच्या प्रत्येक घटकाला चालना देणारे भारताचे पहिले वन स्टॉप ठिकाण म्हणून आम्ही ब्रँडच्या समावेशाद्वारे तसेच सध्याचे ट्रेंड्स आणि ब्रँडच्या ग्राहकांसाठी वैयक्तिक कंटेंट धोरणांच्या डिझाइनद्वारे क्रांती घडवून आणू. ग्राहकांना अनुभवाच्या प्रवासावर नेत असताना हे सर्व साध्य केले जाईल.’

गोक्वेस्ट डिजिटल स्टुडिओजला नवीन युगाच्या प्रेक्षकांना आवडतील अशा दर्जेदार साहित्याची निर्मिती करून आणि या गोष्टींमध्ये आपल्या ऑफरिंगचा समावेश करण्यासाठी ब्रँडना आमंत्रित करून पारंपरिक ब्रँड सहभागामध्ये मोठे बदल करायचे आहेत. ब्रँडेड साहित्याचे अंतिम उद्दिष्ट हे फक्त उत्पादनांची वैशिष्टे न सांगता गोष्ट सांगण्याचे असेल याची खातरजमा करून गोक्वेस्ट डिजिटल स्टुडिओज अंतिम वापरकर्त्यांसाठी ब्रँड जाणीवजागृती अधिक सहभागपूर्ण करते आणि उद्योगांना फायदा मिळवून देते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search