Next
लक्ष्याची स्वानंदीही आता रुपेरी पडद्यावर..
भाऊ अभिनय बेर्डेपाठोपाठ मराठी सृष्टीत करणार पदार्पण
BOI
Thursday, August 30, 2018 | 05:37 PM
15 0 0
Share this story

स्वानंदी बेर्डेसुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता कलाकार लक्ष्या आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे आता वडिलांचा आदर्श घेत मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. 

मागील वर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत दमदार एंट्री केली होती. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत आता स्वानंदीही ‘अभिनया’चा कित्ता गिरवणार आहे. दिग्दर्शक किशोर बेळेकर दिग्दर्शित ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटातून स्वानंदी पदार्पण करणार आहे. 

अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डेस्त्रियांचे भावविश्व आणि त्यांच्या छटा यांभोवती फिरणारा हा चित्रपट आहे. स्त्रियांच्या दररोजच्या जगण्यातील विविध छटा असलेल्या सहा कथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहेत. त्यातील एका कथेत स्वानंदी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे हा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच स्वानंदीकडे आणखी एका चित्रपटाची ऑफर आहे. अभिनेता सुमेध मुद्गलकर याच्यासोबत ती आगामी ‘मन येड्यागत झालंय’ या चित्रपटातही दिसणार आहे.   

स्वानंदी बेर्डे आणि प्रिया बेर्डेसोशल मिडियावरही चांगल्या प्रकारे अॅक्टिव्ह असणारी स्वानंदी तिथल्या तिच्या फोटोंवरून तिचे आयुष्य छान एन्जॉय करताना दिसते. सोशल मिडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. तिची ही लोकप्रियता तिच्या करियरच्या बाबतीत तिला किती उपयोगी पडेल, हे पाहणे मजेशीर असेल. तिचा अभिनय लोकांच्या किती पसंतीस उतरतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link